विधानसभा निवडणुका तोंडावर असताना उद्धव ठाकरे(politics) गटाला मोठा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. पालघरमध्ये शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय.पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि शिवसेना उबाठाच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या उमेदवार भारती कामडी यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
भारती कामडी यांच्यासह पालघर सह संपर्कप्रमुख वैभव संखे आणि उपनेते जगदीश धोडी यांनीही शिंदे गटात पक्षप्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. निवडणुका जवळ आल्या असताना उद्धव ठाकरे यांना हा धक्का बसला आहे.
भारती कामडी यांना लोकसभेत ठाकरे गटाकडून उमेदवारी(politics) मिळाली होती. त्यांना चार लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती. 2020 मध्ये त्यांची पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. येथे त्यांनी दीड वर्ष काम केलं. सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत. मात्र, त्यांनी आता शिंदे गटात प्रवेश केलाय.
पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. हेमंत विष्णू सावरा यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या भारती कामडी यांचा पराभव केला होता. सावरा यांना 6 लाख 1 हजार 244 मतं मिळाली. तर कामडी यांना 4 लाख 17 हजार 938 मतं मिळाली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पालघर मतदारसंघासाठी राजेंद्र गावित यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गटाचे विद्यामान आमदार श्रीनिवास वनगा यांना डावलून येथे राजेंद्र गावित यांना तिकीट देण्यात आलंय.
हेही वाचा :
पवारांची राजकीय विरक्ती जुन्याच घोषणेची पुनरुक्ती
‘बाईईई.. आता साडी नेसल्यानेही होतो कॅन्सर?’
BSNL पडणार सर्वांवर भारी, 5G टॉवर बसवण्याचे काम सुरू, Airtel Jio’ची चिंता वाढली