आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार विनेश फोगटला पदक(medal) मिळणार नाही. सीएएसमध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सीएएसने हा निर्णय दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकच्या महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या फाइनलपूर्वी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला निर्धारित वजनापेक्षा जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. या प्रकरणानंतर क्रीडा लवादाच्या न्यायालयात आपल्या एकत्रित रौप्यपदक मिळावा या मागणीसाठी फोगटकडून याचिका दाखल करण्यात आली होती.
विनेश फोगटच्या याचिकेवर क्रीडा लवादाच्या न्यायालयात (medal)सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात निर्णय देताना CAS ने विनेश फोगट यांची याचिका फेटाळली असल्याची सध्या माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, आज CAS ने विनेश फोगटची याचिका फेटाळली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या निर्णयाला दुजोरा दिला आहे. विनेशकडे अजूनही या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय आहे.
तर दुसरीकडे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.पी.टी.उषा यांनी CAS च्या या निर्णयावर आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. तसेच आम्ही नेहमी खेळाडूच्या पाठीशी उभे राहणार असं देखील भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.पी.टी.उषा यांनी म्हटले आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पी.टी. उषा क्रीडा लवादाच्या या निर्णयामुळे निराश झाले आहेत. कारण CAS ने हा निर्णय अनेकदा पुढे ढकलला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जपानच्या युई सुसाकीचा पराभव केला होता. तर क्वार्टर फायनलमध्ये विनेशने युक्रेनच्या ओक्साना लिवाचचा पराभव केला होता आणि सेमी फायनलमध्ये विनेशने क्युबाच्या युस्नेलिस गुझमनचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक 2024 विनेश फोगटचे रौप्य पदक निश्चित मानले जात होते मात्र फायनलच्या पूर्वी निर्धारित वजनापेक्षा जास्त वजन असल्याने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्तीच्या फाइनलपूर्वी तिला अपात्र ठरवण्यात आले होते.
हेही वाचा :
मुख्यमंत्र्यांची बहिण म्हणतेय आता लय भारी वाटतंय….!
बंदूक काढली अन् स्वत:वर गोळी झाडली, कर्मचाऱ्यांसमोरच व्यापाऱ्याचं धक्कादायक पाऊल
वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video