अफेर पडलं महागात महिलेने असं काय केलं ज्यानंतर व्यापाऱ्याने स्वत:ला संपवलं

लग्नानंतर पतीचे किंवा पत्नीचे बाहेर कोणासोबत संबंध असल्याच्या (shocked)अनेक घटना आता समोर येतान दिसत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका व्यापाऱ्याने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. नेमकं काय घडलं जाणून घ्या.एक अत्यंत हैराण करणारी घटना समोर आली आहे. या घटनेनंतर लोक हैराण झाले आहेत. एका व्यापाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडत आपले आयुष्य संपवले आहे. आत्महत्येनंतर त्या व्यापाऱ्याने एक नोट देखील लिहून ठेवलीये, आपण आत्महत्या का करत आहोत हे व्यापाराने लिहिलं आहे.

आता या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. एका महिनेले आपल्याला ब्लॅकमेल करत आपल्याकडून 9 लाख घेतले आणि इतकंच नाहीतर त्यानंतरही जेलमध्ये पाठवले असल्याचे त्या व्यापाऱ्याने नोटमध्ये लिहिलं आहे.लखीमपूर मंगलगंज परिसरात राहणारे व्यापारी मनोज कुमार सोनी वय 34 यांनी हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या केली. रविवारी सकाळी मनोज हॉटेलमध्ये गेले आणि परत सायंकाळी वापस आले.

डीसीपी अभिजीत यांनी सांगितले की, मनोज कुमार सोनी यांनी 15 जुलैला रूम बुक केली. त्यानंतर 11 वाजता कर्मचाऱ्यांनी दरवाजा वाजवला असता (shocked)कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती सैरपुर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर दरवाजा हा तोडण्यात आला तर रूममध्ये मनोज यांचा मृतदेह मिळाला. यासोबतच पिस्तूल देखील बाजुलाच पडला होता. डीसीपी अभिजीत म्हणाले की, मृतदेहाच्या बाजूला एक नोट देखील मिळाली. ज्यामध्ये एका महिलेच्या नावाचा उल्लेख हा करण्यात आलाय.

त्या नोटमध्ये लिहिण्यात आले की, एका महिलेसोबत मैत्री झाली आणि तिने मला खोट्या केसमध्ये फसवले. नऊ लाख रूपये देऊनही ती सतत पैशांसाठी ब्लॅकमेल करत आहे. काही दिवस जेलमध्येही गेलो. मंगलगंजमधील दुकान बंद करावे लागले. परिवारापासून दूर झालो, जामीन मिळाल्यावर बाहेर आलो आणि सीतापूर परिसरात परत दुकान सुरू केले होते.दुकान सुरू केल्याचे समजल्यापासून ती महिला परत ब्लॅकमेल करत आहे.(shocked) आता माझ्याकडे काहीच पर्याय उरला नाहीये, असेही मनोज याने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे. संबंधित महिलेवर कारवाई करून आपल्याला न्याय द्यावा असेही त्या नोटमध्ये म्हणण्यात आले. आता पोलिस या संदर्भात अधिक तपास करत आहे.

हेही वाचा :

उपवासाचा स्पेशल: घरीच बनवा मऊ-मऊ, जाळीदार फराळी ढोकळा

सांगली : चांदोली धरणात जलसाठा वाढल्याने वीजनिर्मितीला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न, आषाढीच्या उत्साहात भर