खळबजनक! १५ वर्षीय मुलाची हत्या; शरीराचे १७ तुकडे करून जमिनीत पुरले

उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात खळबळजनक घटना घडली आहे. बहराईचच्या गायत्रीनगरमध्ये एका १५ वर्षीय मुलाचा मृतदेह (death)शेतात आढळल्याची घटना घडली आहे. या मुलाच्या शरीराचे १७ तुकडे करून पुरल्याचे समोर आले आहे. गायत्रीनगरमध्ये राहणारा हा १५ वर्षीय मुलगा गेल्या १० दिवसांपासून बेपत्ता होता. या ह पोलिसांनी सोमवारी २४ वर्षीय संजय वर्मा, १८ वर्षीय लवकुशला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशच्या बहराइचचे पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी सांगितलं की, विक्रम हा ६ डिसेंबर रोजी संजय वर्माला शेतात मदत करत होता. संजय हा ट्रॅक्टरच्या मदतीने शेती करत होता. यावेळी १५ वर्षीय विक्रम हा ट्रक्टरच्या कापणी यंत्रावर पडला. त्यानंतर जखमी विक्रमला मदत करण्याऐवजी संजयने दूरपर्यंत खेचले. या घटनेत विक्रमच्या शरीराचे तुकडे झाले. या भीषण घटनेनंतर संजय शर्माने विक्रमच्या शरीराचे तुकडे (death)जमीनीत पुरले. तर विक्रमचे कपडे जवळील तलावात फेकून दिले. या दोघांनी विक्रमच्या हत्येनंतर पुरावे नष्ट केले.

दुसरीकडे विक्रमचे कुटुंबीय त्याच्या घरी परत येण्याची वाट पाहत होते. विक्रमच्या कुटुंबीयांनी विक्रमची दोन-तीन दिवस वाट पाहिली. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत विक्रम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी विक्रमचा शोध सुरु केला. पोलिसांनी शोधकार्य सुरु केल्यानंतर १५ डिसेंबर रोजी विक्रमचे कपडे आणि चप्पल जवळील तलावात आढळली. त्यानंतर उपलब्ध पुराव्याच्या आधारावरून पोलिसांनी संशयित आरोपी संजय आणि लवकुशला अटक केली.

पोलिसांच्या चौकशीत दोघांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. पोलिसांनी दिवसभर शेतात खोदकाम केले. त्यानंतर पोलिसांना विक्रमच्या शरीराचे १७ तुकडे आढळले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून घेण्यासाठी शरीराचे तुकडे डीएनए टेस्टसाठी पाठवले. त्यानंतर पुढील तपासासाठी विक्रमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर हत्या करणे आणि पुराव्यासोबत छेडछाड करणे या अंतर्गत गुन्हे नोंदवले. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणावर लक्ष केंद्रीत केलं तर पोलिसांकडून या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची विनंती केली जाऊ शकते.

हेही वाचा :

खुशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये एकत्र मिळणार?

अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?

‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, काही दिवसांतच होणार मालामाल…