मुंबई : मुंबईमधून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. जेथे एका महिलेनं ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं होतं. मात्र ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीम (ice cream) मध्ये कापलेलं बोट आढळून आलं आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील मालाडमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी १२ जूनला एका आईस्क्रीममध्ये कापलेलं बोट आढळून आलं आहे. ऑनलाईन आईस्क्रीम मागवलं होतं. ऑर्लेम ब्रेंडेन सेराओ (वय २७) या नावाच्या व्यक्तीने बुधवारी ऑनलाइन डिलिव्हरी अॅपद्वारे आइस्क्रिमची ऑर्डर दिली होती. आईस्क्रीम खाताना त्यात कापलेलं बोट आढळलं.
या व्यक्तीने बटस्कॉच फ्लेव्हरचे आइस्क्रिम मागवले होते. त्याने आईस्क्रीमच्या बॉक्सचे झाकण उघडताच त्याला बोट दिसले. त्यानं हे बोट बाहेर काढले. जवळपास २ सेमी लांबीच्या बोटाचा तुकडा दिसला. या घटनेमुळे ऑनलाईन कोणती गोष्ट मागवणे आता असुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.
ऑर्लेम ब्रेंडन सेराओ हे एमबीबीएस डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना आइस्क्रिममध्ये बोट असल्याचे समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी तपासणी करत आहे. आईस्क्रीममध्ये आढळलेल्या बोटाचा तुकडा प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आला आहे. हे आईस्क्रीम कुठे बनवले जाते, कुठे पॅक केले जाते, याबाबत शोध घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
मुंबई-गोवा हायवे वर 10 वर्षात 6000 कोटी खर्च करुनही हायवेची अवस्था दयनीय
पाकिस्तान संघावर चालणार देशद्रोहाचा खटला…
वय झाले वगैरे सब झूट; शरद पवार पुन्हा पायाला भिंगरी लावून फिरणार