धक्कादायक… घंटागाडीने दीड वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं

धुळे : येथील सुभाष नगर परिसरातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. धुळे महापालिकेच्या घंटागाडीने दीड वर्षाच्या चिमुकल्याला चिरडले(crushed) आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चिमुकल्याच्या आई-वडिलांनी टाहो फोडला आहे. तसेच परिसरातील नागरिकांनी या घटनेबाबत रोष व्यक्त केलाय.

याबाबत अधिक माहिती अशी की, धुळ्यातील सुभाष नगर परिसरात असलेल्या बर्फ कारखान्याजवळ धुळे महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाने एका दीड वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची(crushed) घटना घडली आहे. या अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जूने धुळे परिसरातील नागरिक आणि चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी रोष व्यक्त केला असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी तत्काळ वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

सरकार समोरील आव्हाने

अजित पवारांनी टायमिंग साधलं, देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवलं, राजभवनात काय घडलं?, VIDEO

सत्तास्थापनेसाठी भाजपचा नवा मास्टरप्लॅन; एकनाथ शिंदे केंद्रात, श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री