धक्कादायक ! भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून

पुणे : विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे मॉर्निंग(political news) वॉकला आल्यानंतर अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सकाळी घडलेल्या या अपहरणानंतर पुणे पोलिसांकडून शोध सुरू असतानाच सायंकाळी त्यांचा मृतदेह यवत परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे हडपसरसह पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अपहरणकर्ते पसार असून, त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. तत्पूर्वी अपहरणानंतर पुणे पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा काढण्यात येणारा माग, अपयशी ठरला आहे.

सतीश सातबा वाघ (वय 58, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) असे अपहरण व खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांचा मुलगा ओंकार यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. माहितीनुसार, सतीश वाघ हे हॉटेल व्यावसायिक तसेच शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यासोबतच ते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा देखील लागत होते.

सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून मॉर्निंग वॉकला(political news) बाहेर पडले. त्यावेळी फुरसुंगी भागातून साडेसहाच्या सुमारास कारमधून आलेल्या चार ते पाच अपहरणकर्त्यांनी त्यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून कारमधून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

दरम्यान, त्यांचे अपहरण का झाले, तसेच त्यांचे कोणाशी आर्थिक व्यवहार किंवा वैमनस्य होते का?, यादृष्टीने तपास सुरू होता. पोलिस युद्धपातळीवर त्यांचा शोध घेत होते. त्याचवेळी सायंकाळी यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघ यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे त्यांचा अपहरण करून खून झाल्याचे स्पष्ट झाले. अपहरण व खून नेमका का करण्यात हे समजू शकलेले नाही. अपहरकर्ते देखील पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सतीश वाघ हे दररोज सकाळी सहाच्या सुमारास आपल्या हॉटेल समोरील मांजरी फुरसुंगी रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असत. त्याची माहिती अपहरणकर्त्यांना होती. त्यानुसार, या रस्त्यावरील आकाश लॉन्ससमोर एका चारचाकी गाडीत दबा धरून बसलेल्या चार-पाच लोकांनी त्यांना उचलून डिक्कीत टाकलं. दररोज मॉर्निंगवॉकला भेटणाऱ्या एका सहकाऱ्याला त्यांनी आरडाओरडा करुन मदत मागितली. मात्र, हा सहकारी गाडीजवळ पोहोचेपर्यंत अपहरणकर्ते गाडी घेऊन फुरसुंगीच्या दिशेने पसार झाले.

वाघ यांचं मांजरी-फुरसुंगी रस्त्यावर ‘ब्ल्यूबेरी’ हे हॉटेल असून ते भाड्यानं चालवायला दिलेलं आहे. तसंच सोलापूर रस्त्यालगत काही दुकानंही भाड्यानं दिलेली आहेत. त्यामुळं ते फक्त आपला पारंपारिक शेती व्यवसाय सांभाळत होते. त्यांचं कोणाशीही वैर नव्हतं, त्यामुळं त्यांचं अपहरण नेमकं कोणत्या कारणासाठी झालं हे अद्याप कळू शकलेलं नाही.

हेही वाचा :

Video: ‘तो’ शब्द काढा, नाहीतर घरात घुसून मारू; करणी सेनेचा ‘पुष्पा-2’साठी इशारा

रील बनवताना आईचे मुलीकडे दुर्लक्ष झाले अन् चिमुकली रस्त्यावर…VIDEO 

टीम इंडिया ‘या’ सामन्यासाठी जाणार पाकिस्तानला, वेळापत्रकातून मिळाला इशारा