सांगलीत बांधकाम कामगारावर जीवघेणा हल्ला, कोयत्याने डोक्यात वार

बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने जीवघेणा(construction)हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. जमीर अब्दुल शेख (वय 36) राहणार चांद कॉलनी मिरज असे जखमी बांधकाम कामगाराचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बांधकाम(construction) करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने जीव घेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जमीर अब्दुल शेख असे जखमी बांधकाम कामगाराचे नाव आहे. जमीर शेख हे रेवनी गल्ली येथे अन्वर जमादार यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेजारी राहणारे हल्लेखोर राजू जमादार आणि त्याच्यासोबत असलेले इतर तीन ते चार जणांनी जमीर शेख यांच्याशी वाद घालून कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केले आहे.

या घटनेनंतर हल्लेखोर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाले. जमीर शेख या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. अन्वर जमादार आणि त्याचे शेजारी राजू जमादार यांच्यामध्ये जागेचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

परंतु बांधकाम कामगाराचा कोणताही संबंध नसताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केल्याने बांधकाम कामगारांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून मिरज शहर पोलिस अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा :

“हवा” च नव्हती, तर मग….., शेट्टींची शिट्टी कशी वाजणार?

सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं! कोल्हापुरी बॅनर्सची रंगली एकच चर्चा

मराठा आरक्षण पुन्हा तापणार! जरांगे पाटलांचे आजपासून अंतरवालीत उपोषण