धक्कादायक! शासकीय ठेकेदाराचे अपहरण करून निर्घुन हत्या

पुणे : सिंहगड पायथ्यापासून अपहरण झालेल्या शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर (वय ७२) यांचा निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी (दिनांक १६) उघडकीस आली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघांना मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतल्याची माहिती अतिरिक्त पोलीस(police) अधीक्षक रमेश चोपडे यांनी दिली.

खडकवासला धरणासह ओसाडे (ता. वेल्हे) गावच्या हद्दीत त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. अत्यंत निर्घृणपणे पोळेकर यांची हत्या केली गेली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी पोळेकर यांच्याकडे २ कोटी रुपयांसह आलिशान चारचाकीची खंडणी मागितली होती, तसेच सप्टेंबर महिन्यात पोलीस(police) चौकीत तक्रार केल्याच्या रागातून हा खून केल्याचे बोलले जात आहे.

विठ्ठल पोळेकर हे शासकीय ठेकेदार होते. गुरूवारी (दिनांक १४) ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यास पहाटे साडेपाचच्या सुमारास सिंहगड पायथ्याकडे गेले होते. दररोज लवकर घरी परत येणारे पोळेकर सकाळी १० वाजले तरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु ते आढळून आले नाहीत. काही दिवसांपूर्वी पोळेकर यांना खंडणीस धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्या कुटूंबांना अपहरणाची शक्यता लक्षात आली. त्यांनी हवेली पोलिसांकडे यासंदंर्भात तक्रार दिली व योगेश उर्फ बाबू किसन भामे या तक्रारीत संशय व्यक्त केला.

तेंव्हापासून हवेली पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीणच्या पथकांकडून त्यांचा शोध घेत होते. विठ्ठल यांना व त्यांचा मुलगा प्रशांत यांना योगेश भामे याने दोन वर्षांपूर्वी मिळालेल्या रस्त्याचे काम पूर्ण करु देण्यासाठी महागड्या आलिशान चारचाकीची मागणी केली होती. ती न दिल्याने त्याने प्रशांत पोळेकर यांच्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.

ती न मिळाल्याने योगेश व त्याच्या बी बी बॉईज टोळीतील साथीदारांनी विठ्ठल यांचे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान शनिवारी सायंकाळी पोळेकर यांच्या शरीराचे काही भाग खडकवासला धरणात तर उर्वरीत छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह ओसाडे गावच्या हद्दीत आढळून आले. पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहे.

हेही वाचा :

विवाहित अन् 3 मुलांच्या बापाच्या प्रेमात होती अभिनेत्री

कसोटीआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कोहलीला दिला इशारा…

बंटी पाटील खुनशी आहेत, विश्वजित कदमांच्या वक्तव्याने सिद्ध झालं; खासदार महाडिकांचा हल्लाबोल