एका दुर्देवी घटनेमध्ये एक 20 वर्षीय तरुण लोकगीत गायिकेचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्या गायिकेचं नाव छायदा प्राओ-होम असं असून रविवारी तिचा मृत्यू झाला. समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, छायदाने उंडो थानी येथे काही दिवसांपूर्वी बॉडी मसाज घेताना मानेचा(massage) मसाज घेतल्यानंतर तिची मान दुखत होती. याच कारणामुळे मानेसंदर्भातील दुखण्याची गुंतागुंत वाढून त्यातूनच गायिकेचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही तरुण गायिका ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून नियमितपणे या पार्लरमध्ये जायची. खांद्याला असलेल्या दुखापतीवर उपचार म्हणून तिने बॉडी मसाज घेण्यास सुरुवात केली. मात्र या(massage) मसाजमुळे तिच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला आणि त्यातूनच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या गायिकेच्या मृत्यूनंतर स्थानिक प्रशासनाने तपासणी केली असता ज्या पार्लरमध्ये छायदा उपचारासांच्या हेतूने जात होती त्या पार्लरकडे अनेक गोष्टींसाठीचा परवाना नसल्याचं उघड झालं आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छायदाने पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात या पार्लरला भेट दिली होती. यावेळेस तिने बॉडी मसाज घेतला. ज्यामध्ये मानेजवळचे स्थायू मोडण्यासंदर्भातील मसाजही तिला देण्यात आलेला. मात्र त्यानंतर दोनच दिवसात तिला मानेच्या मागील बाजूस वेदना होऊ लागल्या. दुसऱ्यांही तिने पहिल्यासारखेच संपूर्ण बॉडी मसाज सेशन घेतलं आणि तिची प्रकृती अजून खालावली. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत तिची 50 टक्क्यांहून अधिक शरीर पॅरलाइज झालं होतं. तिला सक्तीची विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आलेला. ती बेडलाच खिळून होती.
विशेष म्हणजे छायदाने स्वत: थाय मसाजसंदर्भातील शिक्षण घेतलं आहे. असं असतानाही आपल्याबरोबर जे काही घडलं त्याचा या बॉडी मसाजशी काही संबंध असेल असं तिला चुकूनही वाटलं नाही. 6 नोव्हेंबर रोजी तिने पुन्हा एकदा मसाज थेरिपी घेतली असता यावेळेस तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर वेगवेगळ्या तंत्रानुसार दाब देण्यात आला. मात्र या मसाजनंतर छायदाच्या शरीरावर जागोजागी सूज आली. तिच्या बोटांनाही वेदना जाणवू लागल्या. तिच्या शरीरातील संवेदना हळूहळू जाऊ लागल्या. हा प्रकार एवढा घातक होता की तिच्या उजव्या हताच्या संवेदनाच गेल्या.
18 नोव्हेंबर रोजी छायदाच्या शरीरातील सर्वच संवेदना जणू संपल्याप्रमाणे ती वागत होती. तिने या मसाज पार्लरविरोधात खटला दाखल करण्याचा ठरवलं. मात्र तिच्याकडे त्यांच्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. दुसरीकडे दिवसोंदिवस तिची प्रकृती खालावत गेली. 8 डिसेंबर रोजी तिला उपचारासाठी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र शरीराअंतर्गत बरीच गुंतागुंत झाल्याने तिचं रक्त दुषीत झालं आणि मेंदूला सूज आली. यातच तिचा मृत्यू झाला.
छायदाच्या मृत्यूनंतर उंडो थानी येथील स्थानिक आरोग्य प्रशासनाने तिने मसाजची ट्रीटमेंट घेतलेल्या पार्लरवर छापा टाकला असता तेथे सुरु असलेल्या अनेक गोष्टींसाठी परवानाच नसल्याचं उघड झालं. दरम्यान या पार्लरच्या मॅनेजरने त्यांच्याकडील मसाज देणारे प्रशिक्षित असल्याचा दावा केला आहे. मानेसंदर्भातील मसाज घेताना प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी असंही या मॅनेजरने म्हटलं आहे.
परवाना असलेल्या मसाज देणाऱ्यांकडूनच मानेचा मसाज करुन घेतला पाहिजे हे जे काही छायदाबरोबर घडलं त्यामधून स्पष्ट होतं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मानेसंदर्भातील मसाजमध्ये अनेकदा मानेतून जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना फटका बसतो. या रक्तवाहिन्यांना सूज आल्याने मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्ट्रोक्स किंवा स्नायू गळून पडण्याच्या अथवा पॅरालिसीसची समस्या उद्भवू शकते.
हेही वाचा :
“काम झाले, विषय संपला…; लाडकी बहीण योजनेवरून संतापलेला अभिनेता”
आजचे राशी भविष्य
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार? फेसबुक पेजला केलं फॉलो