धक्कादायक! परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्याचा चाकूहल्ला

चीनच्या जिआंगसू प्रांतातील यिक्सिंग शहरातील एका शाळेत हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने(student) चाकूने हल्ला करून चक्क 8 जणांची हत्या केली. विद्यार्थ्याने केलेल्या हल्ल्यात 17 जण जखमीही झाल्याचे स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

यिक्सिंग शहरातील पोलिसांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली असून, जिआंगसू प्रांतातील वूशी व्होकेशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी येथे संध्याकाळी हा हल्ला झाला. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की हल्लेखोर दुसरा कोणी नसून एक शालेय (student)विद्यार्थी आहे ज्याचे वय 21 वर्षे आहे.

यिक्सिंगच्या सार्वजनिक सुरक्षा ब्युरोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 21 वर्षीय संशयित, आडनाव जू, याला घटनास्थळी पकडण्यात आले आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी परीक्षेत नापास झाल्याबद्दल आणि इंटर्नशिपच्या पगारावर असमाधानी असल्याबद्दल संताप व्यक्त करण्यासाठी आरोपी शाळेत पोहोचला होता.

याआधी मे महिन्यातही चीनच्या दक्षिण जिआंग्शी प्रांतातील एका शाळेत चाकू हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मात्र, घटना घडली त्यावेळी मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता की नाही हे स्पष्ट झाले नाही. हा हल्ला एका ४५ वर्षीय महिलेने केल्याचे पोलिसांनी सांगितले होते, तिने फळे तोडण्यासाठी चाकूचा वापर केला होता. पोलिसांनी सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, या महिलेवर नंतर त्यांचे नियंत्रण होते.

चीनमध्ये गेल्या काही महिन्यांत चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका व्यक्तीने युनानमधील निवासी जिल्ह्यात लोकांवर चाकूने हल्ला केला आणि दोघांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. याच्या काही आठवड्यांपूर्वी, जुलैमध्ये दक्षिण-पूर्व प्रांतातील ग्वांगडोंगमधील बालवाडीत तीन मुलांसह सहा जणांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (17-11-2024) : astrology

संविधान बदलण्याची घोषणा भाजपला पडणार भारी?

तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं