सातारा जिल्ह्यातील कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेच्या(bank) शाखेत बँक कर्ज नाकारल्याने एका बँक मॅनेजरवर कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बँक मॅनेजर आशिष कश्यप यांच्यावर रेठरे बुद्रुक येथील आशुतोष दिलीप सातपुते याने हल्ला केला.
माहितीनुसार, शेळी पालनासाठी आवश्यक कर्ज देत नसल्याच्या कारणावरून आशुतोषने बँक(bank) मॅनेजरवर सशस्त्र हल्ला केला, ज्यामध्ये मॅनेजर कश्यप गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
जिथे नात्यांची माती होते ते राजकारण काय कामाचे!
धक-धक गर्लने दाखवलं तिचं 53 व्या मजल्यावरील घरं, आतून आहे खूपच खास
दिग्गज क्रिकेटपटूच्या घरात झाली चोरी, चोरट्यांनी मौल्यवान दागिन्यांसह पुरस्कारही केले लंपास