टीव्ही इंडस्ट्रीमधून धक्कादायक बातमी, 23 वर्षाच्या प्रसिद्ध अभिनेत्याचा मृत्यू!

टीव्ही अभिनेता (actor)अमन जैस्वालचा शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबईतील जोगेश्वरी भागात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अवघ्या २३ वर्षीय अभिनेत्याच्या अपघाती मृत्यूमुळे मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

‘धरतीपुत्र नंदिनी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा(actor) अमन जैस्वाल मोटारसायकलवरून ऑडिशनसाठी जात होता. त्यावेळी एका ट्रकने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमनला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अमन जैस्वाल हा उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी होता. त्याने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर त्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. विविध मालिकांमध्ये त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. २०२३ मध्ये ‘धरतीपुत्र नंदिनी’ या टीव्ही मालिकेतील प्रमुख भूमिकेमुळे त्याने खास प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता.

अभिनेता अमनच्या अकाली निधनामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी अपघातातील ट्रक जप्त केला आहे. चालकाविरुद्ध बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून अडवतोय कोण? आदित्य ठाकरेंचा थेट सवाल

पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने 4000 लाडक्या बहिणींची माघार, अदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर जाणार!