धक्कादायक ! नोकरीच्या आमिषाने महिलेला एका खोलीत नेलं, वारंवार अत्याचार केले अन् …

लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवलेल्या परराज्यातील एका(woman) महिलेची पणदरे (ता. बारामती) येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून सुटका केली आहे.

याप्रकरणी खामगळवाडी येथील आरोपीवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पीडितेला (woman)नोकरीच्या आमिषाने एका खोलीत नेऊन अत्याचार करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणदरे गावात एका परराज्यातील महिलेस डांबून ठेवण्यात आलेले असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले आहेत, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती.

सदरची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून त्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आदेशाची कारवाई करण्याच्या सूचना पथकाला देण्यात आल्या होत्या.

या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला पत्र्याच्या शेडमध्ये आढळून आली. तिच्याकडे चौकशी केली असता पीडित महिला ही मूळ मध्यप्रदेशची असून, तिचा पती तळेगाव दाभाडे येथील कंपनीतील काम सुटल्याने गावी गेला होता. पीडित महिला सध्या एकटीच तळेगाव दाभाडे येथे काही महिन्यांपासून राहत होती.

तळेगाव दाभाडे येथे कंपनीत काम करणाऱ्या मैत्रिणीकडून पोपट धनसिंग खामगळ याच्यासोबत ओळख झाली. त्याचा हॉटेल व्यवसाय आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर पोपट धनसिंग खामगळ याने पीडितेस पणदरे येथील त्याच्या हॉटेलमध्ये काम देतो व 15 हजार पगार देतो, असे सांगून खामगळ याने पीडितेस बारामती येथे बोलावून घेऊन तिला बारामती येथून पणदरे येथे काम चालू असलेल्या हॉटेलवर नेले.

नंतर पहाटेच्या वेळी पीडित महिला ही पत्र्याच्या खोलीत झोपलेली असताना पहाटेच्या वेळी आरोपी पोपट खामगळ याने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही तर कोणास काही एक सांगितले, तर खून करील अशी धमकी दिली. तुझ्यावर वॉचर नेमलेले आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न केला तर फिक्स खून करील, अशी धमकी आरोपीने दिली होती.

दरम्यान, शुक्रवारी (ता. ११) खून करण्याची धमकी देऊन मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. हॉटेल कामासाठी आलेल्या एका जोडप्यातील महिलेस शारीरीक संबंध ठेवण्यासाठी तयार कर, असे पीडित महिलेस त्याने सांगितले होते. पीडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्याने तिला पुन्हा मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करून डांबून ठेवले.

पीडित महिलेने जोडप्यातील महिलेच्या फोनवरून तिचे नातेवाईकास फोन करून सर्व झालेला प्रकार सांगितला. सदर ठिकाणी गुन्हे शाखेच्या व माळेगाव पोलिसांनी पथकाच्या मदतीने पीडितेची सुटका केली. पीडित महिलेने आरोपी पोपट खामगळ याच्याविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

विधानसभेला उभं राहणार नाही” शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याची मोठी घोषणा!

Video : हत्तीसमोर तरुणाची ताकद, पुढे तरुणाचं काय झालं हे पाहा,? तुम्हालाही होईल धक्का!

धनुषचा अनोखा अंदाज: चाहत्यांना ‘पोंगल’च्या शुभेच्छा आणि आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!