धक्कादायक! 85 विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी

आजकाल देशात येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच आता तब्बल 85 विमानं (airplane for sale)बॉम्बने उडवण्याची धक्कादायक धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे. मात्र आता ही धमकी कोणी दिली आणि काय दिली याची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, इंडिगोची 20 विमानं, एअर इंडियाची 20, विस्ताराची 20 आणि अकासा एअरलाइन्सची २ अशी एकूण मिळून तब्ब्ल 85 विमानं(airplane for sale) उडवून देण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांमध्ये 90 पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानं बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. मात्र या धमकीनंतर दिल्ली पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आहेत.

यामध्ये अकासा, इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडिया या विमान कंपनीची विमानं बॉम्बने उडवू अशी धमकी आली आहे. या धमकी प्रकरणात आत्तापर्यंत आठ वेगवेगळ्या FIR देखील दाखल करण्यात आलेल्या आहेत. तसेच दिल्लीहून देशातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय विमानांना ही धमकी दिली आहे.

यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार धमक्यांचे हे मेसेज सर्वात आधी एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर देण्यात आले आहेत. मात्र ते सुरुवातीला तपास अधिकाऱ्यांनी फेटाळले. तसेच यामधील सर्वात पहिलं प्रकरण हे 16 ऑक्टोबरला समोर आलं होतं.

मात्र आता थेट 85 विमानं उडवण्याची धक्कादायक धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे तपास यंत्रणा देखील अलर्ट मोडवर आहेत. मात्र आता दिल्ली पोलिसांचा साबयर सेल विभाग सध्या या संपूर्ण प्रकारच्या घटनांवर लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा :

आता तर हद्दच झाली! तरूणाचा उलटे बसून बाईक चालवण्याचा स्टंट; व्हिडिओ व्हायरल

‘भाईजान’ला पुन्हा धमकी, “सलमान खानने माफी मागावी, नाहीतर…”; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचा इशारा

महायुतीच्या प्रचाराचा मास्टरप्लॅन! पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ दिवस असणार महाराष्ट्र दौऱ्यावर