धक्कादायक! टीएमसी- भाजप कार्यकर्ते भिडले; मारहाणीत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम(clash) सुरू आहे. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टी आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात भाजपच्या महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झालेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या(clash) टप्प्याच्या आधी पश्चिम बंगालमधील नंदीग्राममध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली, ज्यामध्ये भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर भाजपचे ७ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.ही घटना 22 मे रोजी रात्री उशिरा नंदीग्रामच्या सोनचुरा येथे घडल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रचाराच्या वादातून भाजप आणि टीएमसीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. भाजप कार्यकर्त्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचा आरोप टीएमसी कार्यकर्त्यांवर आहे. राठीबाला आडी असे या हाणामारीत मृत्यू झालेल्या महिला भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारमध्येही असाच प्रकार घडला होता. बिहारमध्ये आरजेडी आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्य़कर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्येही अशीच घटना घडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

त्या दोघांना “व्यवस्थे” ने चिरडले

‘धैर्यशील मानेंना पराभवाची भीती म्हणून भाजप जिल्हाध्यक्षावर…’, ‘स्वाभिमानी’चा दावा

सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्ता मेळाव्याला विशाल पाटलांची उपस्थिती, चर्चांना उधाण