दौंड : विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याचे शिक्षकांना सांगितल्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर(student) आधी बलात्कार आणि नंतर तिचा खून करावा, यासाठी 100 रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत उघडकीस आला आहे.
शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीने(student) मुलांची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह वर्गशिक्षक व शिक्षिका, अशा तिघांवर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दौंड पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी दौंड शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. तिच्या वर्गातील विद्यार्थ्याने पालकांची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती तिने वर्गशिक्षिकेला दिली होती.
त्याचा राग मनात धरून संबंधित विद्यार्थी व त्याच्या मित्राने नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यार्थिनीवर बलात्कार करून नंतर तिला हत्या करण्यासाठी 100 रुपयांची सुपारी दिली. मात्र, त्या विद्यार्थ्याने याबाबत माहिती विद्यार्थीनीला दिली. त्यानंतर तिच्या वडिलांनी मुख्याध्यापकांकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फिर्यादींनी पोलिसांत धाव घेतली.
पोलिस चौकशीदरम्यान मुख्याध्यापकांनी विद्यार्थीनीच इतर विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचे सांगितले. तसेच, मुलीने विद्यार्थ्याला 100 रुपये दिल्याचे म्हटले. शिवाय त्यांनी मुलीला दुसऱ्या शाळेत टाका, असे सुचविले. हे प्रकरण लपविण्यासाठी व शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापक व दोन शिक्षकांनी कटकारस्थान करून दुर्लक्ष केले. त्यामुळे पीडितेचे मानसिक व शैक्षणिक नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
हेही वाचा :
‘पंछी बनू उडता फिरु …’, रस्त्याच्या मधोमध तरुणाचा विचित्र डान्स अन्…; Video Viral
इचलकरंजीचे माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले…
टोरेस प्रकरणात बडा अभिनेता अटकेत; ब्रँड उभारणीत केली होती मदत