गेल्या काही वर्षात तरुणाईमध्ये हृदयविकाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. कधी मैदानात खेळताना अनेकांना हृदयविकाराचा झटका येतो तर अनेकदा लग्नाच्या कार्यक्रमातच. सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा (video)व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका तरुणीला डान्स करताना हृदयविकाराचा झटका येतो आणि ती स्टेजवर कोसळते.
एका कार्यक्रमानिमित्ताने एक स्टेट बांधून अनेक लोक तिथे आलेले दिसत आहेत. त्यातच तीन तरुणी स्टेजवर डान्स करण्यास सुरुवात करतात. त्यांच्या डान्स काही वेळ सुरु असतो मात्र त्यातील लाल रंगाची साडी नेसलेली तरुणी अचानक स्टेजवर कोसळते. तिला पाहून अन्य तरुणी तिला पकडण्यासाठी धावून जातात. अशा प्रकारे संपूर्ण घटना(video) कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.
व्हायरल होत असलेल्या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ”indiatodayne” या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. संपूर्ण व्हायरल होत असलेला व्हिडिओ आसाम येथील असल्याचे समजते मात्र नक्की घटना कधीची आहे हे समजू शकलेले नाही. मात्र सध्या सोशल मीडियावर या घटनेची चर्चा होत आहे.
व्हायरल होत असलेली घटना पाहून बऱ्याच नेटकऱ्यांनी हैराजणक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,”नक्की कशामुळे झाले असेल” तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,”बापरे” तर अनेक यूजर्संनी हैराजणक प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.
हेही वाचा :
शिंदेंना गृहखात्यावर पाणी सोडावं लागणार?, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण
अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद
अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद