कोल्हापूर(Kolhapur) जिल्ह्यात वारे वसाहतीत सुट्या पैशांवरून झालेल्या वादामुळे दुकानावर कोयता व एडक्याने तोडफोड करण्यात आली. हा प्रकार काल सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी यश खंडू माने, ऋतिक साठे (दोघे रा. वारे वसाहत) आणि मंथन (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील
वारे वसाहतीत (Kolhapur)एका लग्न सोहळ्यासाठी आलेल्या १४ वर्षीय मुलाने खेमाराम चौधरी यांच्या दुकानातून कॅडबरी खरेदी करताना सुट्या पैशांवरून झालेल्या वादामुळे वादंग उफाळून आला. यावेळी, दुकानदार खेमाराम चौधरी यांच्या पत्नी कमला चौधरी यांनी त्या मुलाशी वाद घालून दुकानातील एक बरणी त्याच्या दिशेने भिरकावली. तसेच त्या मुलाला मारहाण करून हुसकावून लावले.
संतप्त प्रतिक्रिया
मुलाला झालेल्या मारहाणीची माहिती त्याच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर यश माने, ऋतिक साठे व मंथन या तिघांनी हत्यारांसह दुकानात शिरकाव केला. त्यांनी एडका व कोयत्याने दुकानातील बरण्या आणि काऊंटरवरील खाद्यपदार्थांची तोडफोड केली. याशिवाय, दुकानदार खेमाराम चौधरी यांना दुकानातून बाहेर ओढून मारहाण करण्यात आली.
पोलिस तपास
या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खेमाराम चौधरी आणि कमला चौधरी यांच्याविरोधात १४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे, तर यश माने, ऋतिक साठे आणि मंथन यांच्याविरोधात दुकान तोडफोड आणि मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हेही वाचा :
संजय दत्तच्या आयुष्यातील चौथ्या लग्नाची चर्चा, ‘या’ अभिनेत्रीचं नाव ऐकून थक्क व्हाल!
‘आशिकी २’ची जादू परतणार! श्रद्धा आणि आदित्य पुन्हा रोमँटिक जोडीच्या भूमिकेत!
अजित पवारांचं मौन संपलं! धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर दिलं धक्कादायक विधान!