पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांनी(political updates) एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याच्या मुद्द्यावरून पवारांवर टीका केली आहे. त्यानंतर शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली. त्यात आता ठाकरेंना त्यांच्याच पक्षाच्या एका माजी आमदाराने देखील घरचा आहेर दिला आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांकडून ठाकरेंना निशाणा करण्यात आलं आहे.

ठाकरे गटाचे कोकणातील माजी आमदार(political updates) वैभव नाईक यांनी या विषयावर बोलताना म्हटले की, शरद पवार हे राजकारणातील अनुभवी आणि मोठे व्यक्ती आहेत. त्यांना 50-60 वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे शरद पवारांनी शिंदेंच्या दिल्लीत केलेल्या सत्कारावरून त्यांना आता टीका करून उपयोग नाही. त्यांच्याशी 2019 ला आघाडी करतानाच विचार करायला हवा होता. आता 2025 ला त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा शिवसेना पक्ष वाढीकडे लक्ष द्या. असा सल्ला देखील यावेळी नाईक यांनी दिला.

तसेच पुढे ते म्हणाले की, शरद पवारांच्या राजकारणाचा कोणालाही ठाव लागत नाही. ते ज्या शिंदेंनी त्यांचं सरकार पाडलं. त्यांचाच सत्कार स्वीकारतात ही आणि त्यांचा सत्कार देखील करतात. तसेच त्यांच्याशी 2019 ला आघाडी केली तेव्हाच त्यांना 4 वेळा मुख्यमंत्री असल्याचा अनुभव होता. तुम्हाला देखील ही सगळी पार्श्वभूमी माहिती होती. असंही नाईक म्हणाले.

दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा देखील राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नारााज असल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. त्यानंतर त्यांनी आता ठाकरे गटाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे.

हेही वाचा :

पाच वर्ष लहान क्रिकेटपटूच्या नेतृत्वाखाली कोहली करणार ‘विराट’ खेळी

आता नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार सेवेत; लांबचा प्रवास होणार सुकर

साईरत्न एंटरटेन्मेंटवर प्रेमकवी अपूर्व राजपूत यांनी लिहीलेल्या कवितेतून साकारलेलं “एक चांदण्याची रात” हे गीत प्रदर्शित

आता नवीन इलेक्ट्रिक बसेस येणार सेवेत; लांबचा प्रवास होणार सुकर