लवकर रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन चित्रपटातून मोठ्या पडद्यावर कमबॅक(dating) करण्यासाठी सज्ज झाली आहे. श्वेता तिवारीने टीव्ही इंडस्ट्रीसोबतच भोजपुरी चित्रपटांमध्ये धमाका केला आहे. तिचा वेगळा चाहतावर्ग आहे, जो तिच्याबद्दल प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आतूर असतो. श्वेता तिवारीही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत अपडेट्स शेअर करत असते. श्वेता तिवारी नेहमीच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली आहे. आता श्वेता तिवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीचं सध्या एका अभिनेत्यासोबत(dating) जोडलं जात आहे. अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. श्वेता तिवारीच्या रिलेशनशिपच्या बातम्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान, श्वेता तिवारीचं नाव कोणत्या अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे आणि या दोघांचं नेमकं काय नातं आहे, हे जाणून घ्या.
श्वेता तिवारी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असण्यासोबत आघाडीची भोजपुरी अभिनेत्रीही आहे. वयाच्या 40 शीतही तिचं सौंदर्य तरुणाईला लाजवेल, असं आहे. याचं कारणामुळे तिचे लाखो चाहते आहेत. श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं असून हिट डान्स नंबरही दिले आहेत. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला श्वेताचा प्रवास भोजपुरी सिनेमांसह बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे.

अभिनेत्री श्वेता तिवारीचं नाव तिच्यापेक्षा वयाने 10 वर्ष लहान असणाऱ्या अभिनेत्यासोबत जोडलं जात आहे. श्वेता तिवारी अभिनेता फहमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. श्वेता तिवारीचा दुसरा पती अभिनव कोहलीसोबत घटस्फोट झाल्यानंतर तिचं नाव फहमान खानसोबत जोडलं जात होतं. अभिनेता फहमान खानला टीव्ही शो ‘मेरे डॅड की दुल्हन’मधून करिअरमधला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. या शोमध्ये श्वेता तिवारी मुख्य भूमिकेत झळकली होती. या मालिकेदरम्यान, श्वेता आयुष्यातील एका वाईट टप्प्यातून जात होती, तिचा दुसऱ्यांदा घटस्फोट झाला होता.
दरम्यान, श्वेता तिवारीसोबतच्या अफेअरच्या बातम्यांबाबत फहमान खानने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत एकदा सांगितलं होतं की, माझ्या प्रत्येक मालिकेमध्ये माझ्या रिलेशनशिपबद्दल अफवा उडतात. फहमान खानने सांगितलं की, त्याने आजपर्यंत कोणत्याही सह-अभिनेत्रीला डेट केलेलं नाही. फहमन म्हणाला, “माझं वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं आहे. मी जिथे काम करतो, तिथे मला माझं काम आणि प्रयत्न वाया घालवायचे नाहीत. मला वाटते की, तुम्ही कामाच्या ठिकाणी तिथे नातेसंबंध निर्माण केले, तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल.”
हेही वाचा :
कोल्हापुरातील शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांवर माकडाच्या कळपाचा हल्ला
अविवाहित असतानाच गरोदर, सत्य लपवलं; बाथरुममध्ये प्रसूती करताना तरुणीचा मृत्यू
आज ‘या’ 5 राशींवर राहणार शनीची कृपा, प्रत्येक कामात मिळणार दुप्पट लाभ