सोन्याने गेल्या दोन महिन्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. चांदीत(session) चढउताराचे सत्र होते. बजेटनंतर मौल्यवान धातुने मोठी उसळी घेतली. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यासह चांदीने पण दरवाढीचा गुलाल उधळला. सोन्यासह चांदीने मोठी झेप घेतली आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, सोने वधारले. तर चांदीने मोठी झेप घेतली आहे. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..

गेल्या आठवड्यात सोने 1250 रुपयांनी स्वस्त झाले तर 320 रुपयांनी महागले होते. तर सोमवारी सोन्यात मोठा बदल दिसला नाही. तर आज सकाळच्या सत्रात सोने 700 रुपयांहून अधिकने महागल्याचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,770 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.गेल्या आठवड्यात चांदी 5 हजारांनी स्वस्त झाली होती. तर 500 रुपयांनी महागली होती. आज सकाळच्या सत्रात चांदीत एक हजारांची महागाईचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 85,320, 23 कॅरेट 84,978, 22 कॅरेट सोने 78,153 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता(session) 63,990 रुपये, 14 कॅरेट सोने 49,912 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 94,398 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या(session) सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
हेही वाचा :
इचलकरंजीत सम-विषम पार्किंगबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन
तुम्हालाही अन्न पचवण्यास त्रास होतो का करा ही योगासनं औषधांशिवाय मिळवा आराम
डोक्यावर कर्जाचा डोंगर, उसनवारीच्या पैशांचा तगादा, बायको अन् पोटच्या लेकानं केली बापाची हत्या; सांगली हादरलं