‘सिंग इज ब्लिंग’, ‘2.0’, ‘ॲक्शन जॅक्सन’, ‘एक दिवाना था’ अशा चित्रपटांतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री(actress) एमी जॅक्सनने ३१ जानेवारीला तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून एमी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने वाढदिवसाचा एक खास फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

एमी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या पोस्ट्स चर्चेचा विषय ठरतात. नुकतेच तिने तिच्या वाढदिवसाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये ती बेडवर झोपलेली असून, वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावेळी तिने तिचे अंग चादरीने झाकलेले आहे. तिच्या या बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
या फोटोमुळे एमी जॅक्सन दुसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एमीने एड वेस्टविकशी लग्न केले आहे. याआधी ती जॉर्जला डेट करत होती आणि त्यांना एक मुलगा आहे. जॉर्ज हा एक करोडपती व्यापारी आहे. काही दिवसांपूर्वी एमीने (actress)बेबी बंपचे फोटो शेअर करत, “मी त्या क्षणाची वाट पाहत होते जेव्हा मी हे फोटो शेअर करेन आणि छतावर आनंदाने ओरडेन,” असे लिहिले होते. एमीच्या या फोटोमुळे आणि तिच्या दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या बातमीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हेही वाचा :
रोहित शर्माची शेवटची वन डे मालिका?
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार?
ट्रम्प यांची ऑफर अन् एकाच वेळी 40 हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा