व्हायरल अटॅकनंतर गायिका अलका याज्ञिकना ऐकूच येईना

९० च्या दशकातील प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अलका याज्ञिक(viral attack) सध्या चर्चेत आल्या आहेत. अलका याज्ञिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केलेल्या एका पोस्टमुळे सर्वांना धक्का बसला आहे. या पोस्टनंतर त्यांचे चाहते चिंतेत आले आहेत. अलका याज्ञिक यांना व्हायरल अटॅकनंतर ऐकू येणं बंद झालं आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. त्यानंतर चाहते त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहेत.

गायिका अलका याज्ञिक यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम(viral attack) अकाऊंटवर त्याचा एक जुना फोटो शेअर करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे अलका याज्ञिक यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिली. या पोस्टद्वारे त्यांनी त्या एका दुर्मिळ शारीरिक समस्येचा सामना करत असल्याचे सांगितले. या समस्येमुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना व्हायरल अटॅकमुळे हा त्रास झाला आहे. या पोस्टद्वारे त्यांनी चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

अलका याज्ञिक यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले की, ‘माझे सर्व फॅन्स, मित्र, फॉलोअर्स आणि शुभचिंतकांनो… काही आठवड्यांपूर्वी विमानातून उतरल्यानंतर मला अचानक जाणवले की मला काहीच ऐकू येत नाहीये. यानंतर मी हे व्यक्त करण्याचे धाडस केले. मला माझे मौन तोडायचे आहे. मी कुठे आहे हे माझ्या मित्रांना आणि हितचिंतकनांना सांगायचे आहे.’

अलका यांनी पुढे असे लिहिले की, ‘व्हायरल अटॅकनंतर माझ्या डॉक्टरांनी मला दुर्मिळ सेन्सरी नर्व हिअरिंग लॉस झाल्याचे निदान केले. अचानक झालेल्या या सेट बॅकमुळे मला मोठा धक्का बसला. मी आता याच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.’ तसंच, अलका याज्ञिक यांनी आपल्या चाहत्यांना आणि तरुण पिढीला मोठ्या आवाजात संगीत ऐकणे आणि हेडफोनचा वापर सावधगिरीने करण्याचा सल्ला दिला आहे.

त्याचसोबत, ‘एक दिवस मी माझ्या आयुष्यातील आरोग्यविषयक जोखीम तुमच्यासोबत शेअर करेन. तुमच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी माझ्या आयुष्याची पुनर्रचना करुन आणि लवकरच तुमच्याकडे परत येईन अशी आशा करते. यावेळी तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा असेल.’, असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले.

अलका याज्ञिक यांच्या या पोस्टनंतर त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटींनी त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. प्रसिद्ध गायक सोनू निगमसह चाहते त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सोनू निगमने लिहिले की, ‘मला वाटले काहीतरी गडबड आहे, मी तिकडे आल्यानंतर तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही लवकर बऱ्या व्हा.’ त्याच्याशिवाय पूनम ढिल्लनने लिहिले की, ‘तुम्हाला खूप प्रेम, प्रार्थना आणि आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही लवकरच पुन्हा पूर्णपणे निरोगी व्हाल.’

हेही वाचा :

कुणी मारून टाकीन म्हणतो, गोळ्या घालीन म्हणतो…; मनोज जरांगेच्या विधानाने खळबळ

आधी टोकाचे वाद अन् मग दिलजमाई…; विशाल पाटील आणि विश्वजीत कदम एकत्र कसे आले?

पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, पण आपण वादळात दिवा लावला; धैर्यशील मानेंचा विरोधकांवर निशाणा