किसिंग वादानंतर गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली भारतरत्नची इच्छा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक(Singer) उदित नारायण सध्या चर्चेत आले आहेत. अलीकडेच, गायकाचा लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यानचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान एका महिले चाहतेला किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आणि लोकांनी उदित नारायण यांना खूप ट्रोल केले.

दरम्यान, आता या गायकाचे(Singer) एक नवीन विधान समोर आले आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतरत्नची इच्छा व्यक्त केली आहे. खरंतर उदित यांनी सांगितले की, ‘मला आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत पण मला भारतरत्न मिळावा अशी इच्छा आहे.’ असे त्यांनी म्हटले आहे.

गायक उदित नारायण यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान भारतरत्न मिळण्याची इच्छा व्यक्त केली आणि म्हणाले, ‘मला आतापर्यंत अनेक चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण. मला लताजींसारखे भारतरत्न मिळावे अशी इच्छा आहे कारण त्या माझ्या आदर्श आहेत.

या मुलाखतीदरम्यान उदित नारायण यांनी लता मंगेशकर यांना त्यांचे आवडते सह-गायक म्हटले आणि सांगितले की, आतापर्यंत मला जे काही मिळाले आहे ते आई सरस्वतीच्या कृपेनेच मिळाले आहे.’ असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

एवढेच नाही तर उदित नारायण यांनी किसींच्या व्हायरल व्हिडिओवर आपले मौनही सोडले आहे. लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या या वादाबद्दल ते म्हणाले की, मला याबद्दल लाज वाटत नाही. ते म्हणाले की, ‘मी कधी असे काही केले आहे का ज्यामुळे मला, माझ्या कुटुंबाला किंवा देशाला लाज वाटली असेल?’ मग मी माझ्या वयाच्या या टप्प्यावर असे काहीतरी का करू आणि तेही जेव्हा मी सर्वकाही साध्य केले आहे.

हे माझ्या आणि माझ्या चाहत्यांमधील एक खरे आणि कधीही न तुटणारे बंधन आहे. तुम्ही पाहिलेला व्हिडिओ माझ्या आणि चाहत्यांमधील प्रेमाचा होता. ते मला प्रेम करतात आणि मी त्यांना आणखी प्रेम करतो.’ असे म्हणून त्यांनी या व्हिडिओवर आपले मत मांडले आहे.

हेही वाचा :

उदित नारायणनंतर गुरु रंधावाचा व्हिडीओ व्हायरल, सेल्फी काढताना तरुणीने केलं KISS

क्रिकेटरशी लग्न करण्यासाठी ‘ही’ टीव्ही रिपोर्टर झाली मुस्लिम, प्रेमासाठी तोडली धर्माची भिंत!

मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या मुलाने जीवन संपवलं…