शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर(biting) कुत्र्याने हल्ला केल्याचे समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. आता यात काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनीही उडी घेतली.त्या कुत्र्याला काय दुर्बुद्धी सुचली, कुणाला चावाव कळल नाही. याच वाईट वाटत. त्यामुळे भिंडे यांना चावणाऱ्या कुत्र्यांची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी उपरोधिक मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

चंद्रपुरात आज माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी भिडे यांच्यावर बोचरी टीका केली. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे. मात्र या प्रामाणिक प्राण्याने का राग धरला याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मंगेशकर कुटुंबीयांचे सामाजिक योगदान नाही.या वक्तव्यावर मी आजही ठाम(biting) आहे. दिवंगत लता मंगेशकर छान गायच्या.जनतेचा प्रतिसाद त्यांना होता. हे आम्ही मान्य करतो. मुंबईतील पेडवर रस्त्यावरच्या उड्डाणपुलाला त्यांना वैयक्तिक कारणांसाठी विरोध केला होता. देश सोडण्याची धमकी दिली होती. हे विसरता येणार नाही. विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमाला निःशुल्क येण्याचे कबूल केले.

त्यानंतर २२ लाखांची मागणी केली. त्यामुळे तो कार्यक्रमच रद्द करावा लागला. कोल्हापूरचा भालाजी पेंढारकर यांचा स्टुडिओ कुणी हडपला हे महाराष्ट्राला माहीत(biting) आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने एका महिलेचा जीव घेतला आहे. ते धर्मदाय रुग्णालय नाही तर लुटारूंचे रुग्णालय आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली
चंद्रपुरात भाजपमध्ये दोन गट पडले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहे. दोनचे तीन गट व्हायला हवे. काँग्रेसमध्ये फूट होती तेव्हा भाजपला फायदा व्हायचा. आता त्यांच्यातील फुटीचा आम्हाला लाभ होईल, असे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
लग्नाच्या सुरुवातीला कधीच करु नका ‘या’ 5 गोष्टी….
संजना गणेशनच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड झाला KL राहुल; दिले असे उत्तर… इंटरव्यूचा Video Viral
हुश्श…! अखेर महागाई झाली कमी, मार्चमध्ये घाऊक महागाई दर 2.05 टक्क्यापर्यंत घसरला