कंटेनरने कारवर कोसळल्याने सहा जण ठार: सांगलीतील दुर्दैवी घटना सीसीटीव्हीत कैद

बंगळुरु-तुमाकुरू राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये(accident) सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सुरक्षित कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारमधील चालक असलेल्या 46 वर्षीय सीईओबरोबर त्याचं संपूर्ण कुटुंब संपवणाऱ्या या अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या अपघातात 40 हजार किलो वजनाचा कंटेनर या कारवर पडल्याने कारचा चेंदामेंदा झाला. तालेकारे येथे निलामंगला पोलीस स्थानकाच्या हद्दीत शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा सर्व थरारक घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

2002 साली रिलीज झालेली एक्ससी 90 एसयुव्ही कारने आयएएसटी सॉफ्टवेअर कंपनीचे कार्यकारी निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रयागोपाल गौल (46) हे त्यांच्या कुटुंबाबरोबर प्रवास करत होते. त्यावेळी विरुद्ध बाजूच्या लेनमधून जाणारा कंटेनर गौल यांच्या कारवर पडला. अपघात एवढा भीषण होता की या अपघातात कारमधील सहा जण मरण पावले असून मृतांमध्ये चंद्रयागोपाल यांची पत्नी गौरबाई (40), चंद्रयागोपाल यांची बहीण विजयालक्ष्मी (35) या तिघांबरोबरच तीन लहान मुलांचाही मृत्यू झाला. मृत मुलांमध्ये चंद्रयागोपाल यांचा 16 वर्षांचा मुलगा जान, 10 वर्षीय मुलगी दिक्षा आणि 6 वर्षीय भाची आर्याचाही समावेश आहे. चंद्रयागोपाल हे मूळचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मोरबागी गावातील होते. मात्र ते मागील अनेक वर्षांपासून कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यात राहत होते.

बंगळुरुच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरसमोर अचानक एक कार आली. या कारच्या चालकाचं नियंत्रण सुटल्याने अचानक कंटेनरसमोर आलेल्या कारला धडक देऊ नये या हेतूने कंटेनर चालकाने कचकचून ब्रेक दाबला आणि उजवीकडे स्टेअरिंग वळवलं. धडक होऊ नये या प्रयत्नात हा कंटेनर एका लॉरीला धडकला. एका कारला धडक न देण्याच्या प्रयत्नात त्याच्या कंटेनरने डिव्हायडर तोडून समोरच्या लेनमध्ये प्रवेश केला. मागे 40 हजार किलोचं वजन असल्याने कंटेनर कलंडला आणि बाजूच्या लेनमधून जाणाऱ्या चंद्रयागोपाल यांच्या आलीशान कारवर पडला. या अपघातात कारमधील सहाही जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात (accident)एवढा भीषण होता की कंटेनरखाली दाबल्या गेलेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढतानाही पोलिसांबरोबर प्रशासनाला फार कसरत करावी लागली. कंटेनर चालक हरीफ अन्सारी हा मूळचा झारखंडचा आहे. कंटेनरचालकालही गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याच घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये चंद्रयागोपाल यांचा काहीच दोष नव्हता. चंद्रयागोपाल यांचं कुटुंब नव्याकोऱ्या व्होलव्हो एसयुव्हीमधून प्रवास करत होते. ही सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक आहे. ही कार एक कोटींहून अधिक किंमतीची असून ती बाजारात दाखल झाल्यानंतर मागील 22 वर्षांपासून या कारच्या अपघातात कोणी मरण पावल्याचं ऐकिवात नव्हतं.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य

इचलकरंजी : “चाळके गटाचा महाविकास आघाडीला दणका? ‘घड्याळा’सोबत राजकीय नवा प्रवास सुरू!”

आता 10 मिनिटांत किराणा घरपोच मिळणार…