स्कोडाचा मोठा धमाका: ‘या’ कारवर लाखोंचा अप्रतिम डिस्काउंट

स्कोडा इंडियाने एप्रिल 2023 मध्ये भारतात थर्ड जनरेशन सुपर्ब लाँच केली. सुपर्बची किंमत 54 लाख रुपये आहे स्कोडाने इंपोर्टेड सुपर्बचे फक्त 100 युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असतील असे सांगितले होत. रिपोर्ट्सनुसार, डीलरशिप स्कोडा सुपर्बवर इन्व्हेंटरी क्लिन करण्यासाठी 18 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहेत. त्यामुळे ही (car)कार खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

18.25 लाख रुपयांची सूट
Skoda Superb (car)ची एक्स-शोरूम किंमत 55 लाख रुपये आहे आणि तिची ऑन-रोड किंमत 57.23 लाख रुपये या कारवर 18.25 लाख रुपयांची सूट मिळत आहे.

इंजिन आणि पॉवर
2024 Skoda Superb च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 2.0-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे जे 187bhp पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट करते. हे 7-स्पीड DSG ऑटोमॅटिक युनिटसह कनेक्ट केले आहे.

या महिन्यात Mahindra XUV400 वर 3.1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. हे डिस्काउंट फक्त XUV400 च्या टॉप-स्पेक EL Pro व्हेरिएंटवर मिळत आहे. यात 39.4kWh आणि 34.5kWh चा बॅटरी पॅक आहे. रोजच्या वापरासाठी XUV400 ही कार चांगला ऑप्शन आहे. याशिवाय XUV700 वर तुम्ही 40,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. Mahindra XUV400 ची इंडियात एक्स-शोरूम किंमत 16.74 लाख रुपये ते 17.69 लाख आहे रुपये.

हेही वाचा :

परप्रांतीयांची वाढती दादागिरी.., मुंबईच्या मराठी भाषिकांवर

जसप्रीत बुमराह करणार टीम इंडियाचं नेतृत्व?

BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका!