झोपही एक नैसर्गिक, शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. ती शरीर (relaxes)आणि मनाला आराम देते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर आपली ऊर्जा पुन्हा भरते, पेशी दुरुस्त करते आणि मेंदूतील विविध माहितीवर प्रक्रिया करते. झोपेच्या दरम्यान, शरीर आणि मेंदूमध्ये काही बदल होतात. जसे की, हृदय गती आणि श्वसन गती कमी होणे, स्नायू शिथिल होणे आणि मेंदूतील विचार प्रक्रिया मंदावणे.

अलिकडेच एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, जे लोक झोपल्यानंतर 5 मिनिटांत किंवा त्याहूनही कमी वेळात झोपी जातात. त्यांना काही गंभीर समस्या असू शकतात. पाच मिनिटांत झोप येणे, हे झोपेच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. ते कदाचित झोपेची गुणवत्ता खराब असल्यामुळे किंवा झोपेच्या कमतरतेमुळे असू शकते. स्लीप हेल्थ फाउंडेशन 18 ते 64 वयोगटातील प्रौढांसाठी दररोज रात्री सात ते नऊ तास झोपेची शिफारस करते.
हे नेहमीच शक्य नसते कारण प्रत्येक 5 पैकी एका व्यक्तीला पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे त्याला झोपेचा अभाव राहतो. सतत झोपेचा अभाव हा हृदयरोग, स्ट्रोक, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, नैराश्य, चिंता आणि अल्झायमर यासारख्या अनेक गंभीर शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांशी (relaxes)जोडलेला आहे.तज्ञांनी एक टाइमलाइन तयार केलीय. ती तुम्हाला झोपायला किती वेळ लागतो आणि तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगते, हे दर्शवते. खरं तर, 5 मिनिटांपेक्षा कमी वेळात झोप लागणे हा एक गंभीर धोका असल्याचे दिसून आलंय. तर झोपेसाठी निरोगी कालावधी 5 ते 20 मिनिटे आहे. खूप लवकर झोप येणे, हे नार्कोलेप्सी सारख्या वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला झोप येण्यासाठी 20 ते 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला तर ते निद्रानाशाचे लक्षण असू शकते.
झोपेचा अभाव अनेक कारणांमुळे होऊ शकतो, परंतु जर तुम्ही समस्या ओळखू शकला नाही तर ती कालांतराने गंभीर होऊ शकते. म्हणूनच तुम्ही एखाद्या तज्ञालाही भेटले पाहिजे. झोपेला अडथळा आणणारे घटकरात्रीचा आवाज, फोन, टीव्ही आणि टॅब्लेटमधून येणारा स्क्रीन लाइट आणि बाहेरील (relaxes)प्रकाश यामुळेही झोप येत नाही. जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या गोष्टीबद्दल विचलित किंवा काळजी वाटू शकते, ज्यामुळे तुम्हाला झोप येत नाही. याशिवाय, ड्रग्जचे व्यसन, धूम्रपान आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसणे यासारख्या सवयी देखील निद्रानाशासाठी जबाबदार असू शकतात.
हेही वाचा :
‘एफआरपी’चा निर्णय! सरकारने सांगितलं पण शिंदेंना खटकलं, नेमकं काय घडलं?
Captain Rohit Sharma चा सिनेमा तुम्ही पाहिलात का ? क्रिकेटरने केलंय दिग्गज कलाकारांसोबत काम
सलमान खानचा सिकंदर प्रदर्शनासाठी सज्ज, पहिल्याच दिवशी तगडी कमाई करण्याची शक्यता