मुंबई सेंट्रल येथे महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत तस्करीचे 23 किलो सोने (Gold)जप्त केले आहे, ज्याची किंमत सुमारे 17 कोटी रुपये आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रलकडे सोने घेऊन जात असताना या आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पायल जैन, पंखुदेवी माली, आणि राजेश कुमार जैन यांचा समावेश आहे. DRI ने सापळा रचून या आरोपींना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडील बॅगांमध्ये 22.89 किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. शिवाय, तस्करीच्या सोन्याच्या विक्रीतून मिळवलेले 40 लाख रुपये देखील घरात लपवले होते, ती रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
आरोपींवर सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा:
मविआचा महायुतीला धक्का: राज्यात दर आठवड्यात दोन पक्षप्रवेश…
पासपोर्ट अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील पाच दिवस सेवा बंद;
“उद्धव ठाकरेंची खरंच दया येते…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका