आंब्यांच्या पेट्यांमधून दारूची तस्करी; तिघांना अटक

आंब्याच्या रिकाम्या पेट्यांच्या आड मद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. आंब्याच्या लाकडी पेट्यांमधून दारुची (alcohol) तस्करी केली जात होती. गोव्यातील मद्याची अवैध विक्री करणाऱ्या ट्रकवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. तब्बल १२ लाख रुपयांच्या विदेशी मद्यासह एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाने ही धडक कारवाई केली आहे.

विविध विदेशी मद्य बँडचे एकूण १२ लाख रुपये किंमतीचे विदेशी मद्य तसेच दोन वाहन, दोन मोबाईल असा एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा मद्यसाठा अहमदनगर जिल्ह्यात विक्री करण्याच्या उद्देशाने परराज्यातून वाहतूक करुन आणल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. याप्रकरणी नामदेव खैरे, संदीप सानप, गोरख पालवे, महेश औताडे यांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, पुण्यामध्ये २५० ते ३०० गुटख्यांची पोती जप्त करण्यात आली आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातील नऱ्हे परिसरातून १ कोटी ३९ लाख किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. एकाच ठिकाणी असलेल्या गुटखा कारखाना आणि गोडाऊनवर पोलिसांनी हा छापा टाकला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा :

तीन खासदार एकत्रित येऊन करणार कोल्हापूरचा विकास…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १ कोटी रुपायांचा गुटखा जप्त

राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चित्रपटात झळकणार ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री