नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानुसार, आता महायुतीकडून सरकार(government) स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत. गुरुवारी (दि.5) नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. हा सोहळा सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पण आता 5 तारीख आणि 5 वाजता हे समीकरण दिसत असल्याने याचीच चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार की आणखी कोणी, हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी शपथविधीची वेळ मात्र ठरली आहे. येत्या 5 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा(government) शपथविधी होणार आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी तिथी दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी समाप्त होत असून, सायंकाळी 5 वाजता शुक्ल पक्षातील पंचमीचा मुहूर्त हा अत्यंत शुभ आहे. यावेळी मुंबई येथील वातावरणात शुभ ग्रह गुरुचा शुभ प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार असल्याचा दावा ज्योतिषाचार्यांकडून केला आहे.
विशेष म्हणजे ज्योतिषाचार्यांनी शपथविधीच्या वेळेस वृषभ असल्यामुळे महायुती सरकार पुढील पाच वर्षे चांगल्याप्रकारे कार्य करेल, असे भाकितही केले आहे. शनि आणि राहू ग्रहांच्या भ्रमणामुळे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जन्म कुंडलीनुसार ते मुख्यमंत्र्याची शपथ घेतील, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
महाराष्ट्रात या वेळेला शपथ ग्रहण सोहळा होणार आहे. शपथ ग्रहण करणाऱ्या मंत्रिमंडळातील सदस्यांना मुंबईच्या पत्रिकेमधील कर्म स्थानात असलेला व राजकारणासाठी योग्य असलेला शनि आशीर्वाद देणार आहे. मुंबई येथे शुक्र आणि चंद्र हे शुभग्रह भाग्य स्थानात राहतील, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, सोमवारी सकाळी अचानक त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या. यामुळे महायुतीतील सुरू असलेल्या संघर्षाच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र, शिंदे यांची प्रकृती ठीक नसून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. मात्र, महायुतीचा भाग असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीची यामध्ये नवी भूमिका पाहायला मिळत आहे.
महायुतीचा भाग असलेला भाजप मोठा ‘खेला’ करण्याच्या तयारीत असल्याचीही अंतर्गत चर्चा आहे. शिंदे सरकारमध्ये सहभागी होत नसतील तर त्यांना विरोधी पक्षनेते करून मोठी खेळी खेळण्याची तयारी आहे. त्यामुळे सरकार चालवणे सोपे होईल.
हेही वाचा :
ताजमहल बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांची धावाधाव, शहरात खळबळ
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती
च्विंगम प्रमाणे जिवंत कोंबडीला चघळू लागली गाय Video Viral…