भाजप पक्षामध्ये जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं….; शरद पवारांचा सर्वात मोठा खुलासा

अजित पवार हे भाजपसोबत गेले. त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल(revelation) अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. या शिवाय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी तर याआधीही शरद पवारांनी भाजपसोबत बोलणी केली होती, असा दावा केला. शरद पवार भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करत होते.

मात्र ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय(revelation) बदलला, असं विधान तर खुद्द अजित पवारांनी देखील केलं आहे. त्यामुळे खरंच भाजप सोबत जाण्यासाठी शरद पवार सकारात्म होते का? त्यांची भूमिका नेमकी काय होती? या सगळ्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे. एका मुलाखती दरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं काय होतं? आणि त्यांची भूमिका काय आहे? यावर भाष्य केलंय.

2004, 2014, 2017, 2019 यावेळी शरद पवारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्यासाठी चर्चा केली, असा दावा राष्ट्रवादीचे नेते करतात. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं.

आमच्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचं हे मत होतं की आपण भाजपसोबत जावं. दोन पद्धतीने त्यांच्यासोबत जाण्याबद्दल बोलत होते. एक त्यांच्याबरोबर सत्तेत जावं आणि दुसरं म्हणजे भाजप पक्षात जावं असं काही सहकाऱ्यांचं म्हणणं होतं, असं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा :

क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! विराट अचानक निवृत्ती जाहीर करु शकतो…

..तरच शरद पवारांशी जुळवून घेऊ, निकालापूर्वी अजित पवार यांचं मोठं वक्तव्य !

अजित पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी वाटले : संजय राऊत