कोणी काहीही बोलू लागल वातावरण तापत चालल….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला सत्ता संघर्ष विधानसभा(political correctness) निवडणुकीच्या निमित्ताने आता अधिक धगधगीत बनला आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही, कारण जागा वाटपावरून ते स्पष्ट झाले आहे. निवडणूक निकालानंतर तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक पूर्व आघाडी केली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ समजला गेला आहे.

दोन्हीकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही पण निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार बनवण्यासाठी राज्यपालांच्याकडून निमंत्रण दिलं जातं. त्यावरून मुख्यमंत्री कोण असेल याचा काहीसा अंदाज येतो. तर एकूणच या निवडणुकीचा आवाज आता हळूहळू वाढू लागला असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तो आणखी तीव्र स्वरूपात वाढत जाईल. मात्र निवडणूक वातावरण आता तापायला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल विधानसभा(political correctness) मतदारसंघातील बहुतांशी गावे संवेदनशील आहेत. कोल्हापूर दक्षिण मध्ये पाचगाव जसं राजकीय कळीचा मुद्दा ठरतय, तसा कागल चा गैबी चौक तणावपूर्ण असतोय. इथे महायुतीचे हसन मुश्रीफ आणि महाविकास आघाडीचे समरजीत सिंह घाटगे यांच्यात लढत होत आहे. हा एकमेव मतदार संघ असा आहे की इथे पक्षापेक्षा गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाते. शुक्रवारी या दोन गटात हाणामारी झाली.

दोन्ही गट एकमेकाला भिडले. कार्यकर्त्यांनी एकमेकांची गचांडी धरली. वातावरण बघता बघता तणावग्रस्त बनले. एका वृत्तवाहिनीच्या “मुद्द्याचं बोला”या कार्यक्रमात हा प्रकार गैबी चौकात घडला. तेथे मुद्द्याऐवजी गुड्ड्याची भाषा जोरात बोलली गेली.

कोल्हापूर दक्षिण हा सुद्धा मतदारसंघ महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील राजकीय शत्रुत्वासाठी प्रसिद्ध आहे. या मतदारसंघातील पाचगाव हे करंगळीच्या नखा एवढं गाव अति संवेदनशील म्हणून ओळखले जाते. हे दोन्ही गट शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शासकीय कार्यालयाचा आमने-सामने आले होते. बघा बघी झाली. पण सुदैवाने काही अनुचित घडले नाही. मात्र निवडणूक काळात अनुचित असं घडणारच नाही असे म्हणता येणार नाही.

कोल्हापूर उत्तर या विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून कोणाला उमेदवारी मिळते याबद्दल शुक्रवारी सायंकाळपर्यंत उत्सुकतात ताणली गेली होती. शनिवारी महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे राजू लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शनिवार आणि रविवार दरम्यानच्या मध्यरात्री स्टेशन रोडवरील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तिथे कुणीतरी”चव्हाण पॅटर्न”असे लिहून ठेवले होते.” कही पे निगाहे कही पे निशाना” असा काहीसा हा प्रकार म्हणता येईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात आरोपांची राळ किंवा धुरळा ओढण्यास प्रारंभ झाला आहे. शेळके विशेषणांचा वापर सुरू झाला आहे. गद्दार, भ्रष्टाचारी, खलनायक, हैवान, सैतान अशा विशेषणांची देवाण-घेवाण सुरू झाली आहे. जुने ऑडिओ, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जाऊ लागले आहेत. धार्मिक पोस्ट व्हायरल केली जात आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार आदींचे जुने व्हिडिओ जुनी भाषणे व्हायरल केली जात आहेत.

जीव घसरणे हा काही राजकारण्यांचा स्थायीभाव बनला आहे. जीव घसरणे किंवा जीव असेल सोडणे यातून तप्त वातावरणाची निर्मिती होते हे माहीत असूनही अनेकांची बडबड सध्या सुरू आहे. नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या गावी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे वसंतराव देशमुख यांनी जी भाषा वापरली आहे ती कुणीही मान्य करणार नाही. देशमुख यांची जीव चांगलीच घसरलेली आहे.

त्यातून वातावरण(political correctness) तापले आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर भाजपच्या वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. त्याचवेळी सुजय विखे पाटील यांनी व बाळासाहेब थोरात यांच्या गटाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. मला मारण्याचा डाव होता. मी जात असलेल्या रस्त्यावर जाळपोळ करण्यात आली. गाडी पेटवण्यात आली. हे सर्व मला भीती घालण्यासाठीच होते असे त्यांनी म्हटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या लगत असलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणच्या गजाली आता रंगू लागल्या आहेत. इकडे सिंधुदुर्गात राणे विरुद्ध वैभव नाईक तिकडे रत्नागिरी ते भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम उदय सामंत वगैरे यांच्यात ऐन दिवाळीत आरोपांच्या फटाक्यांचे आवाज घुमणार आहेत आणि त्याची सुरुवात ही झाली आहे.

संपूर्ण निवडणूक काळात कुठेही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. संवेदनशील गावामध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी पथ संचालन केले आहे. गावगुंड आणि समाजकंटक यांना काही कालावधीसाठी हद्दपार करण्यात आले आहे. निवडणूक यंत्रणेने, जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घेतली असली तरी वातावरण तापणार आहे हे मात्र निश्चित.

हेही वाचा :

खासदार महाडिकांनी एकाचवेळी शिराळा आणि कोल्हापूर उत्तरसाठी डाव टाकला, पण हुकला

महाविकास आघाडीत पेच निर्माण; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता बंडखाेरीच्या तयारीत

दिवाळीनंतर अंधार होईल इतकी राज्याची तिजोरी साफ केलीय; विजय वडेट्टीवार यांची घणाघाती टीका