शिरूर शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्हेगरीचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शिरूर पोलिस मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान शिरूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रांजणगाव सांडस ता. शिरुर येथील (woman)आरती पाटोळे या घरात असताना त्यांचे पती, नणंद व सासू यांनी तू नणंद पूजा हिच्या मुलांकडे लक्ष का देत नाही असे म्हणून, शिवीगाळ, दमदाटी करत हाताने तसेच रबरी पाईपने मारहाण करत जखमी केले.

मारहाण करून जखमी केल्याने या प्रकरणी (woman)आरती लक्ष्मण पाटोळे वय २१ वर्षे रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
त्यानंतर शिरूर पोलिसांनी महिलेची नणंद पूजा निलेश अवघडे, पती लक्ष्मण तानाजी पाटोळे व सासू सुमन तानाजी पाटोळे तिघे रा. रांजणगाव सांडस ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र बनकर हे करत आहे.
पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी मध्ये घरात बसलेल्या महिलेच्या गळ्याला तलवार लावून महिलेच्या गळ्यातील दागिने चोरीचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात तीन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरात राहणाऱ्या हिराबाई वाखारे या सायंकाळच्या सुमारास घरात असताना तीन अज्ञात युवक घरामध्ये आले त्यांनी हिराबाई यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान हिराबाई यांनी आरडाओरडा केल्याने घरात आलेले तिघेजण पळून गेले, मात्र घडलेल्या घटनेने स्टेट बँक कॉलनी सह परिसरात खळबळ उडाली. याबाबत रेखा शिवाजी वाखारे (वय ४४ वर्षे रा. स्टेट बँक कॉलनी शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तीन अज्ञात युवकांवर गुन्हा केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहेत.
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसाखाली प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली.
नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा :
दीपिका पदुकोणचा ‘कल्की 2898 AD’मधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
VIDEO मेट्रो सीटवर वाद: दोन मुलींची भिडंत, एकीने कानाखाली ठोकले, दुसरीने केस ओढले”
सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, मुंडेंवरही कारवाई करणार : संजय शिरसाट