गर्भवती महिलेसोबत घडलं असं काही..; व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!

राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यात बऱ्याच ठिकाणी(pregnant) नाले-सफाई तसेच रस्ते आणि पूलांसाठीचे काम ऐन पावसाळ्यात करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशात गडचिरोलीमधून एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात एक धक्कादायक(pregnant) घटना समोर आली आहे. आलापल्ली ते भामरागड या 130-डी क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. यामुळे जाण्या-येण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच पर्यायी रस्ते नसल्याने गावातील लोकांना अवघड वाटेने प्रवास करावा लागत आहे.

अशात दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील झुरी संदीप मडावी या गरोदर मातेला प्रसृती वेदना झाल्या. महिलेला असह्य वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रस्ता देखील व्यवस्थित नव्हता.मग रुग्णालयापर्यंत जावे कसे?, असा मोठा प्रश्न निर्माण झाला.

असह्य वेदना होत असल्याने नतेवाईकांनी रस्त्यावर असलेल्या जेसीबीची मदत घेण्याचा निर्णय घेतला. समोर कोणताच पर्याय नसल्याने जेसीबी चालकानेही याला होकार दर्शवला.त्यानंतर गरोदर मातेला जेसीबीच्या बकेटमध्ये बसवण्यात आले. तिच्यासोबत तिला पकडून आणखी एक जण बसला. त्यानंतर गरोदर मातेला ती अवघड वाट पार करता आली.

सध्या ही महिला सुखरूप असून त्या मातेने भामरागड रुग्णालयात गोंडस बाळाला जन्म दिला आहे. मातेची आणि बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, या प्रकरणाची आता राज्यभर चर्चा रंगली आहे. देश स्वतंत्र होऊन आता सात दशके उलटली आहेत. तरीही गावा-खेड्यात अजूनही लोकांना चांगले रस्ते नाहीत. दळवळणाच्या उत्तम सुविधा नाहीत. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. नेटकरी देखील व्हिडिओवर संतापजनक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. तसेच ऐन पावसाळ्यात या भागात पुलाचे काम हाती घेतल्याने प्रशासनावर देखील टीका केली जात आहे.

हेही वाचा :

अरमान- कृतिकाच्या ‘त्या’ व्हिडिओवरून राजकारण तापलं…

रोहित-विराट 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गौतम गंभीरने केलं स्पष्ट

भाजप चक्रव्यूहात; ‘धरलं तर चावतंय अन् सोडलं तर पळतयं!’ अशी अवस्था