घरगुती वादातून पाईपने मारहाण करुन मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

शिर्डीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटच्या लेकानेच जन्मदात्या वडिलांची निर्घृण हत्या(murder) केल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे हत्येच्या पाचव्या दिवशी ही घटना उघडकीस आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची पाईपने जबर मारहाण करत हत्या केली आहे. दत्तात्रय शंकर गोंदकर असं मारहाणीतून हत्या(murder)झालेल्या वडिलांचे नाव आहे. तर, आरोपी मुलाचे नाव शुभम गोंदकर असं आहे. शुभने घरगुती वादातून त्यांना पाईपने जबर मारहाण केली. त्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ही घटना दडपण्याचा प्रयत्न झाला. 6 मार्च रोजी ही घटना घडली होती. मात्र कुटुंबाकडून अकस्मात मृत्यू झाल्याचे दाखवत होते. मात्र पाच दिवसांनंतर या घटनेचा उलगडा झाला. शवविच्छेदन अहवालातून जबरी मारहाण होऊन त्यातून मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला.

शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत हत्येचा गुन्हा दाखल केला होता. शिर्डीतील प्रतिष्ठित कुटुंबात हा हत्येचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्याद नोंदवत पाच दिवसांनी म्हणजेच दहा मार्च 2025 रोजी शुभम गोंदकर वर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1) अंतर्गत तरुणावर गुन्हा नोंदवला आहे.

शुभम गोंदकर याने पोलिसांनी दिलेल्या जबाबात, वडील दत्तात्रय गोंदकर हे आईला झटापट करत असल्याच्या कारणावरुन वडिलांना हाताने व पाईपने मारहाण केली. त्यानंतर शुभमने वडिलांना जोरात भिंतीवर आपटले. त्यावेळी ते पाठीमागून जोरदार आपटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी शुभमला अटक केली आहे.

हेही वाचा :

“राज” तेरी गंगा मैली…..!

एकनाथ शिंदेंना मोठा झटका! ‘त्या’ 3 महत्वाकांक्षी योजना बंद!

पुरस्कार सोहळ्यात वारंवार वीज खंडित; माजी खासदार निवेदिता माने यांची आयुक्तांना सूचना – “हवा तेवढा निधी मागा, पण नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण करा!”