सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सासरच्या(electric) लोकांनी विजेचा शॉक देऊन जावयाची हत्या केल्याच्या घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.वसंत उर्फ सागर प्रभाकर भगे (वय ३२) असं मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी वसंत भगे यांच्या भावाने तक्रार दाखल केली आहे.
वेंगुर्ला पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, वसंत हा मुळचा(electric)कुडाळ तालुक्यातील माणगाव तळेवाडी येथील रहिवासी होता. वंसत आणि त्याची पत्नी नुतन गावडे यांच्यात काही कारणास्तव वाद झाले होते. त्यामुळे ती माहेरी गेली होती. सोमवारी (12 ऑगस्ट) रात्री नुतनने वसंतला आपल्या घरी म्हणजे आडेली सातेरी गाळू येथे बोलावून घेतले.
पण संशयितांनी वसंत यांची हत्या करण्यासाठी त्यांच्या घराच्या भोवती असलेल्या कंपाऊंडला विद्युत तारांचे जाळे तयार करून ठेवले होते. वंसत त्याच्या पत्नीला भेटायला गेला असताना त्या विद्युत तारांना त्याचा स्पर्श झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. काल (13 ऑगस्ट) सकाळी सासरवाड येथील एका नर्सरीजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
वसंत यांच्या भावाने नुतन गावडेच्या कुटुंबियांनी जाणीवपूर्वक विजेचा शॉक देऊन वसंतची हत्या केल्याचा आरोप केला आहे.वसंत आणि त्याची पत्नी नुतन यांच्यात नेहमी वाद व्हायचे याच वादातून तिच्या कुटुंबियांनी त्याची हत्या केली असावी, असा संशय वसंतच्या भावाने व्यक्त केला आहे. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसांनी वसंतची पत्नी नूतन, सासरे शंकर गावडे आणि सासू पार्वती शंकर गावडे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर न्यायालयीन लढाई: सुनावणी पुढे ढकलली
विनेश फोगटच्या रौप्यपदकाच्या प्रतीक्षेत आणखी वाढ; क्रीडा लवादाचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार
आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल: “हे सरकार महाराष्ट्रातून नव्हे, तर गुजरातमधून चालवलं जातं