“शरीरावर प्रेम करणं हा…”; वजनामुळे ट्रोल होणाऱ्या महिलांना सोनालीनं दिला खास संदेश

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा चाहता(weight loss) वर्ग मोठा आहे. सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करते. अशातच सोनालीनं तिच्या खास लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोला तिलेल्या कॅप्शनमध्ये वजनावरुन ट्रोल होणाऱ्या महिलांसाठी खास संदेश दिला आहे.

सोनालीनं इन्स्टाग्रामवर(weight loss) तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनाली ही ब्लू कलरचा ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. सोनालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, “शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी – जाड किंवा बारीक असणं ही तुमची निवड आहे. आपल्या शरीरावर प्रेम करणं हा आपला अधिकार आहे. मत मांडणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करा. तुमच्या आनंदाला प्राधान्य द्या.”

सोनालीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. सोनाली तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक सध्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील विजयानंतर BCCI सचिवांचा स्टँडमध्ये जल्लोष, Video Viral

उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

आत्मा हा कायम राहत असतो, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा मोदींना इशारा