हायस्पीड ड्रायव्हिंग आणि चॅटिंगचा नाद; दोन जीवलग मित्रांच्या जीवावर बेतलं

गाडी चालवताना फोनवर बोलू नका, मोबाईलवर चॅटिंग(Chatting) करू नका अशा सूचना रस्त्याच्या कडेला फलकावर लावलेल्या असतात. मात्र आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अपघात होतो.

असाच प्रकार मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील कोलार भागात घडला आहे. वेगाने कार चालवताना (Chatting)स्नॅपचॅटवर चॅटिंग करणारे दोन जणांच्या जीवावर बेतले आहे. चॅटिंग करताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट 50 फूट खोल नदीत कोसळले. यात दोन जीवलग मित्रांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश गायकवाड (वय – 25), विनीत (वय – 22) आणि पीयूष गजभिये (वय – 24) हे तिने मित्र कारने फिरण्यासाठी बाहेर गेले होते. विनीत ड्रायव्हिंग सीटवर बसला होता. वेगाने गाडी चालवत असताना तो स्नॅपचॅटवर चॅटिंगही करत होता.

गाडीचा वेग जास्त होता आणि कोलार सिक्स लेनवरील इनायतपूरजवळ केरवा नदीवरील पुलासमोर अचानक वळण आल्याने विनीतचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट खोल नदीत कोसळली. गाडी नदीत पडताच दरवाजे जाम झाले. त्यामुळे विनीत आणि पलाश बाहेर पडू शकले नाहीत, अशी माहिती जखमी पीयूषने दिली.

पीयूषने गाडीची काच फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच पुलावर लोकांनी गर्दी केली होती. त्यापैकीच काहींनी पीयूषला मदत केली आणि त्याला वाचवले.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विनीत आणि पलाश या दोघांचे मृतदेह गाडीतून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी हमीदिया रुग्णालयात पाठवण्यात आले. तर या घटनेत जखमी झालेल्या पीयूषवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?

ना टॅटू, ना स्टाईलिश लूक: क्रिकेटरची निवड न झाल्याने हरभजन संतापला, रोहित-कोहलीवर सवाल!

खळबळजनक! शाहरुखच्या मन्नतवर घुसखोरीचा प्रयत्न: सैफवर हल्ल्याशी संबंध असलेल्या संशयिताचा शोध!