राष्ट्रवादी काँग्रेस (congress) पक्षाचा 25 वा वर्धापन दिनी आहे. याच कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवार भावुक झाले आहेत. शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना अजित पवार यांचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं.
”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्ष पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या शरद पवार यांनी दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल आज पक्षच्या वतीने मी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो”, असं म्हणताना अजित पावर भावुक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांना फक्त एकच जागा जिकंण्यात यश मिळालं आहे. यामुळे आता अजित पवार गटाचे काही आमदार पुन्हा शरद पवार गटात परंतु शकतात, अशा चर्चा होत आहे. यावरच बोलताना अजित पवार म्हणाले की, ”काही बातम्या पेरल्या जातात, हे इकडं तिकडं जाणार आहे, असं सांगतात. हे संभ्रम निर्माण करण्यासाठी होतंय.”
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आहेत की, दिल्लीतर काही लोकांवर कारवाई केली तरी सातपैकी सात जागा भाजपच्या आल्या. नितीश कुमार, चंद्रा बाबू यांच्याबरोबर मागास समाज राहिला, हे खरे आहे.तसंच आपल्याला राहावं लागेल. त्यामुळं जो समाज आपल्यापासून दूर गेलाय तो जवळ आणावा लागेल.
ते म्हणाले, ”राज्याच्या निवडणुकीत संविधान बदलायचा विषय येत नाही. साडे नऊला एक भोंगा (संजय राऊत यांना टोला) वाजतो, तसं दुसऱ्या पक्षातही भोंगा वाजतोय. काँग्रेसमध्ये एक आहे, आपल्या दुसऱ्या गटातला एक आहे. त्याची नौटंकी सुरु (रोहित पवार यांना टोला) आहे. तो सांगतो मला आमदारांचे फोन येतात.”
हेही वाचा :
मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं
इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!
कालच शपथविधी, आज मंत्रिपद सोडण्याची इच्छा; भाजप खासदाराने सांगितली अनेक कारणं