बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींचे आयुष्य जितके ग्लॅमरस दिसते तितकेच ते खासगी (boldvoice)आयुष्यातील वादग्रस्त घटनांमुळे चर्चेतही राहिले आहे. अशीच एक अभिनेत्री जिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांनी एकेकाळी मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली होती. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्रीने एका जुन्या मुलाखतीत केलेला खळबळजनक आरोप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
बॉबी देओलवर गंभीर आरोप
९० च्या दशकात आपल्या मादक अदांनी आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, “अभिनेता बॉबी देओलने तिला चक्क वन नाईट स्टँडची ऑफर दिली होती.” हा आरोप दुसरा तिसरा कोणी नसून, एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने केला होता.
महामंडलेश्वर पद आणि वाद
काही काळापूर्वी ममता कुलकर्णी अध्यात्माकडे वळली आणि तिने संन्यास घेतला. इतकेच नाही तर, महाकुंभात तिला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणूनही नियुक्त (boldvoice)करण्यात आले होते. मात्र, या पदावरून तिला कालांतराने हटवण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर ममता कुलकर्णीची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे.
‘बरसात’च्या शूटिंगदरम्यानची घटना
एका प्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ममताने हा खळबळजनक खुलासा केला होता. ती म्हणाली, “मी ‘बरसात’ चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्या दरम्यान एका हॉटेलमध्ये थांबले होते. बॉबी देओल देखील त्याच हॉटेलमध्ये थांबला होता. आमचा को-स्टार मिथुन चक्रवर्तीने माझी आणि बॉबीची ओळख करून दिली. बॉबीला मी आवडली आणि आम्ही एकमेकांचे चांगले मित्र बनलो. त्यानंतर आम्ही अनेकदा पार्टीला एकत्र जाऊ लागलो.”
“गर्लफ्रेंडची परवानगी घे,” ममताचे सडेतोड उत्तरपुढे ती म्हणाली, “आमची मैत्री घट्ट झाल्यानंतर बॉबीने मला एक रात्र त्याच्यासोबत घालवण्याबाबत विचारले.” हे ऐकून ममताला धक्काच बसला. त्यावेळी बॉबी देओलचे अफेअर अभिनेत्री पूजा भट्टसोबत सुरू होते आणि ही गोष्ट ममताला माहीत होती. त्यामुळे तिने बॉबीला स्पष्टपणे सांगितले की, “जर त्याला माझ्यासोबत एक रात्र घालवायची असेल, तर त्याने (boldvoice)आधी त्याच्या गर्लफ्रेंडची परवानगी घ्यावी.” हे ऐकल्यावर बॉबी देओलही चक्रावला आणि त्याने या विषयाला बगल देत ही गोष्ट मस्करीत उडवून लावली, असे ममताने मुलाखतीत सांगितले.
ममता कुलकर्णीच्या या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा ममता कुलकर्णी आणि बॉबी देओल चर्चेत आले आहेत.ममता कुलकर्णीने बॉबी देओलवर केलेला हा आरोप कितपत खरा आहे, हे केवळ ते दोघेच सांगू शकतात. मात्र, या व्हिडिओमुळे ९० च्या दशकातील बॉलिवूडमधील काही न ऐकलेल्या गोष्टींवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे, हे निश्चित.
हेही वाचा :
वैज्ञानिकांचा धडकी भरवणारा इशारा; लाखो बळी जाणार, कारण वाचून हादरून जाल
भाजपचा ‘मास्टर प्लॅन’…, आयकरात सूट देऊन मध्यमवर्गीयांची जिंकली मने! आता…
मद्यधुंद अवस्थेत तरुणाचा धिंगाणा; मोबाईल टॉवरवर चढला अन्… Video Viral