श्रीलंका विरुद्ध बांगलादेश या आशियाई संघात सामना होणार

आयसीसी टी 20 (t 20) वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 15 व्या सामन्यात डी ग्रुपमधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आमनेसामने असणार आहेत. बांगलादेशचा हा सलामीचा सामना असणार आहे. तर श्रीलंकेचा हा दुसरा आहे. वानिंदू हसरंगा याच्या नेतृत्वात श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे श्रीलंकेसाठी बांगलादेश विरुद्धचा सामना सुपर 8 च्या हिशोबाने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. श्रीलंकेवर दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा दबाव असणार आहे. तर बांगलादेश क्रिकेट टीम नजमुल हुसेन शांतो याच्या कॅप्टन्सीत विजयी सुरुवात करण्यसाठी सज्ज आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना शनिवारी 8 जून रोजी होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस येथे होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्याला सकाळी 6 वाजता सुरुवात होईल. तर 5 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

बांगलादेश पहिल्या सामन्यासाठी सज्ज

श्रीलंका टीम : वानिंदू हसरंगा (कॅप्टन), कुसल मेंडिस (विकेटकीपर), पाथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा, दिलशान मधुशंका, दुनिथ वेल्लालागे, दुष्मंथा चमीरा आणि धनंजया डी सिल्वा.

बांगलादेश टीम: नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), लिटॉन दास (विकेटकीपर), सौम्य सरकार, शाकीब अल हसन, तौहीद हृदोय, महमुदुल्ला, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शॉरीफुल इस्लाम, तनझिम हसन साकिब, तस्किन अहमद, जाकेर अली, तन्झीद हसन, मेहीद हसन आणि तन्वीर इस्लाम.

हेही वाचा :

शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या तलाटी अधिकार्याला घेतले ताब्यात

 किरीट सोमय्या यांच्याविरोधात ठाकरे गटाची पोलिसात तक्रा

लोकसभा जिंकताच शरद पवारांची विधानसभेसाठी मोठी खेळी, काय आहे मेगाप्लॅन?