डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन फेब्रुवारीमध्ये सावंतवाडीत

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार(Journalists) संघटनेचे तिसरे राज्यस्तरीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे होणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी जाहीर केले.

पत्रकार(Journalists)क्षेत्रात प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल मीडिया देखील महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. डिजिटल मीडियात काम करणाऱ्या इतर माध्यमाच्या पत्रकारां प्रमाणे अधिकृत संपादक पत्रकार म्हणून घोषित करावे तसेच त्यांना शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी राजा माने यांच्या नेतृत्वाखाली संघटना सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून दरवर्षी अधिवेशन आयोजित केले जाते.

पहिले अधिवेशन सातारा येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली होती. दुसरे अधिवेशन कोल्हापूर येथे झाले, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यंदा सावंतवाडीत होणाऱ्या अधिवेशनात कोण प्रमुख पाहुणे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ही घोषणा राजमाने यांनी कोल्हापूर येथील बैठकीत केली यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, सचिव तेजस राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, उपाध्यक्ष सुहास पाटील संघटक विनायक कलढोणे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब फास्के आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

इचलकरंजी : शेतजमीन मोजणीसाठी हायटेक यंत्रांचा वापर; अचूक मोजणीसाठी नवा उपक्रम”

केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार?