कर्तबगार महिलांचा राज्यस्तरीय गौरव सोहळा संपन्न

दि. 09 मार्च 2025 रोजी श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे पोलीस मित्र असोसिएशन व वेध फौंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त कर्तबगार महिलांसाठी राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार व 2025 पुरस्कार वितरण सोहळा(ceremony) मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या भव्य सोहळ्याचे उद्घाटन व अध्यक्षस्थान माननीय श्रीमती निवेदिता माने (माजी खासदार, हातकणंगले लोकसभा) यांनी भूषवले. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मा. सौ. पल्लवी पाटील मॅडम (आयुक्त, इचलकरंजी महानगरपालिका) उपस्थित होत्या. तसेच प्रमुख मान्यवर व निमंत्रक डॉ. युवराज मोरे आणि डॉ. रजनीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

पुरस्कारार्थींच्या गौरवासाठी त्यांना शाल, शिल्ड आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रभरातील कर्तबगार महिलांनी हजेरी लावली होती. उपस्थित पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने व प्रेरणादायी शब्दांनी कार्यक्रम अधिक भव्य व उत्साहपूर्ण झाला.

हा संपूर्ण सोहळा नेत्रदीपक आणि प्रेरणादायी ठरला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

हेही वाचा :

हद्द वाढ विरोधकांच्याकडून त्यांच्याच नेत्यांचा पंचनामा

मद्यधुंद अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर झोपला होता तरुण; अंगावरुन मालगाडी गेली अन्…,Video Viral

अर्थसंकल्पात दमदार गिफ्ट! AI तंत्रज्ञान ते मोफत वीज, शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा