शेअर बाजाराचा सोन्यावाणी परतावा, एका वर्षात दिला दणक्यात परतावा;

मुंबई : आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शेअर बाजारात पैसे गुंतवलेेल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा झाला आहे. (share)या आर्थिक वर्षात सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांपेक्षा शेअर्समध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना अधिक फायदा झाला असून शेअर बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली. देशाच्या चांगल्या आर्थिक स्थितीमुळे गेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजारात मोठी गुंतवणूक झाली होती तर, विदेशी आणि देशांतर्गत दोन्ही गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी सुरू ठेवल्यामुळे सेन्सेक्सने विक्रमी उच्चांकावर मजल मारली.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टीने अनुक्रमे २५ आणि २९ टक्के परतावा दिला. तर त्या तुलनेत एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) गोल्ड आणि इंटरनॅशनल गोल्डने या कालावधीत अनुक्रमे १२.५% आणि १३.२% (share)परतावा दिला आहे म्हणजेच २०२४ या आर्थिक वर्षात सेन्सेक्सने सोन्याच्या जवळपास दुप्पट परतावा दिला. एमसीएक्स सोन्याने सकारात्मक परतावा देण्याचे हे सलग सातवे वर्ष आहे तर, आंतरराष्ट्रीय सोन्याने सलग चौथ्या वर्षी सकारात्मक परतावा नोंदवला.

तज्ज्ञांच्या मते, भारताच्या मजबूत आर्थिक वाढीमुळे आणि आर्थिक उत्पादनांमध्ये वाढते स्वारस्य यामुळे सोने सध्या शेअर्सपेक्षा मागे आहे. शेअर बाजारातील प्रचंड तेजीमुळे गुंतवणूकदार सोने आणि रिअल इस्टेटसारख्या भौतिक मालमत्तेऐवजी शेअर्ससारख्या आर्थिक मालमत्तेकडे वळत आहेत. शेअर्समध्ये गुंतवणूक करणे सोन्यापेक्षा जास्त जोखमीचे आहे. परंतु शेअर्समधून मिळालेल्या प्रचंड परताव्याने गुंतवणूकदारांना त्यात अधिक गुंतवणूक करण्यास प्रेरित केले आहे.

देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी भारताच्या दीर्घकालीन वाढीवर दृढ विश्वास दाखवला आहे. दोन्ही गुंतवणूकदारांना आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय शेअर बाजारात २५ अब्ज डाॅलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मोेठी असून यापूर्वी २०२२ आणि २०२३ या आर्थिक वर्षांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून निव्वळ पैसे काढले होते. मात्र, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास परत आला. काही मोठ्या हिंदी राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या निर्णायक विजयानेही हा आत्मविश्वास वाढण्यास मदत केली.

विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या तीन महिन्यांत भारतीय बाजारपेठेत १.१ अब्ज डाॅलर गुंतवले, तर याच कालावधीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १३.१ अब्ज डाॅलर गुंतवणूक केली. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यात एसआयपीद्वारे (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) शेअर बाजारात येणारा पैसा प्रथमच १९ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेला.

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (05-04-2024)

रुग्णालयातील उपचारादरम्यान कमी पडले पैसे? या बँकेने काढला मार्ग

हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं