सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या, पुढे काय घडलं पाहा, VIDEO व्हायरल

बॉलिवूड गायक(singer) सोनू निगम रविवारी दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत कॉलेज फेस्टिव्हलसाठी दाखल झाला होता. यावेळी त्याने परफॉर्म करत विद्यार्थ्यांचं मनोजरंन केलं. यादरम्यान जवळपास एक लाख विद्यार्थी सहभागी होते. यातील काही विद्यार्थ्यांनी सोनू निगमवर बाटल्या आणि दगड फेकल्याने परिस्थिती गंभीर झाली होती.

परिस्थिती इतकी बिघडली की, सोनू निमगला अर्ध्यातच आपला परफॉर्मन्स थांबवावा लागला. त्याने यावेळी विद्यार्थ्यांना असं कृत्य न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्याची टीम सुरक्षेसाठी स्टेजवर हजर झाली.

विद्यार्थ्यांनी फेकलेले दगड आणि बाटल्या लागून सोनू निगमच्या(singer) टीमधील काहीजण जखमी झाले. यानंतर सोनू निगमने विद्यार्थ्यांना सांगितलं की, “मी येथे तुमच्यासाठी आलो आहे, जेणेकरुन आपण सर्वांना चांगला वेळ घालवता येईल. मी तुम्हाला मजा घेऊ नका असं सांगत नाही. पण कृपया असं करु नका”.

सोनू निगमच्या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओत सोनू निगम आपली प्रसिद्ध गाणी गाताना दिसत आहे. यारम्यान कोणीतरी त्याच्याकडे बन्नी बँडही फेकला होता. जो त्याने डोक्यात घालून परफॉर्म केलं.

फेब्रुवारीमध्ये, सोनू निगमचं कोलकाता येथील कॉन्सर्टही चर्चेत आलं होतं. येथे तो बेशिस्त प्रेक्षकांवर रागावला होता. कार्यक्रमस्थळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये सोनू निगम गर्दीवर ओरडताना दिसत होता. तो गर्दीला वारंवार विनंती करताना ऐकू येतो.

एका क्षणी, स्पष्टपणे चिडलेला सोनू निगम असं म्हणताना ऐकू येतो, “अगर आपको खडे होना है तो इलेक्शन में खडे हो जाओ यार (जर तुम्हाला उभे राहायचे असेल तर निवडणुकीत उभे राहा).” या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये नामांकन न मिळाल्याबद्दल सोनू निगमने अलीकडेच आयफा समितीवर टीका केली आहे.

हेही वाचा :

जिल्ह्यात धक्कादायक घटना! ‘या’ भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील बरणीत आढळले मृत अर्भक

अंगावर काटा आणणारा क्षण! यात्रेतील 150 फूट उंच रथाचा कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल

“मुलगी दुसऱ्या घरी गेली तर…”, वडिलांनी स्वतःच्या मुलीशी केलं लग्न; व्हायरल व्हिडिओ