मुक्काम पोस्ट मारकडवाडी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : काही गावे नशीबवान असतात. एका रात्रीत ती साऱ्या महाराष्ट्राला परिचित होतात. अंतरवाली सराटी हे गाव दीड एक वर्षांपूर्वी कोणाला माहित होतं? पण एका रात्रीत हे गाव महाराष्ट्राला माहित पडलं. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया आदि माध्यमातून हे गाव महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलं. आज हे गाव(village) घराघरात पोहोचल आहे. असा एकही नेता नव्हता की ज्याने या गावाला भेट दिली नाही. असे वाटते आता हे गाव मीडियात फारसं ठळकपणे दिसत नाही. आता मारकडवाडी या गावाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अंतरवाली सराटी प्रमाणे शरद पवार हे या गावात पहिल्यांदा गेले होते. आता मारकडवाडीच लोन अनेक गावाचा पोहोचेल किंवा पोहोचवलं जाईल. मतदान यंत्राच्या विरोधात एक जन आंदोलन उभे राहण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघात मारकडवाडी हे छोटसं गाव आहे. विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून उत्तम जानकर हे निवडून आले आहेत पण मारकडवाडी हे त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील गाव(village) असूनही तेथे त्यांना सर्वात कमी मते मिळाली. गावच्या बहुतांशी मतदारांचे म्हणणं असं आहे की आम्ही उत्तम जानकर यांनाच मत दिले होते पण आमचे मत दुसऱ्याच उमेदवाराला गेलं आहे. म्हणजे मतदान यंत्रातच घोळ आहे. या गावात बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्यावे असा ठराव गावाने केला.

सुरुवातीला तेथील तहसीलदारांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे मान्य केलं. पण पोलिसांनी हे मतदान होऊ दिले नाही. कारण या गावात जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश लागू केला होता. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे प्रशासनाने अशा प्रकारे टाळल्यानंतर हे गाव अचानक प्रसिद्धीच्या झोपतात आले आणि मग महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी मारकडवाडी चा विषय रडारवर घेतला आहे. रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार हे या गावात गेले होते.

मतदान यंत्रावर स्थानिक गावकऱ्यांचा विश्वास नाही किंवा संशय असेल तर प्रशासनाने त्याचे निराकरण केले पाहिजे. लोकांचा तो हक्क आहे असे पवार यांनी या गावात भेट दिल्यानंतर सांगितले आहे. शरद पवार यांनी मतदान यंत्रावर थेट संशय व्यक्त केलेला नाही. पण मताच्या आकडेवारीवरून त्यांनी अप्रत्यक्षपणे मतदान यंत्रावर अविश्वास दाखवलेला आहे किंवा संशय व्यक्त केलेला आहे.

गावाने त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले होते पण प्रत्यक्षात त्या उमेदवाराला ते मत गेले नाही. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मतदान यंत्र बद्दल तक्रार करण्याचा, बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून मारकडवाडीच्या ग्रामस्थांची मागणी चूक आहे असे कोणीही म्हणणार नाही.

पण अशाच प्रकारची मागणी अनेक विधानसभा मतदारसंघातील गावातून करण्यात आली तर मग पंचाईत होईल. येथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत यासाठी मारकडवाडीचा आधार घेतला जाईल किंवा एक जन आंदोलन उभे राहील. शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष नेत्यांचा तोच प्रयत्न असेल. विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रभावाखाली असणाऱ्या गावातून(village) आता ग्रामसभा घेऊन बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे असा ठराव करण्यात येईल आणि त्याची सुरुवात झालेली आहे.

मतदान यंत्रावर थेट संशय न घेता शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पडलेली मते आणि निवडून आलेले उमेदवार याची आकडेवारी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर मांडलेली आहे. आम्हाला 80 लाख मते मिळाली आणि उमेदवार मात्र फक्त पंधराच निवडून आले आणि त्यांना 96 लाख मते मिळाली आणि त्यांचे उमेदवार 57 निवडून आले हे कसे काय असा संशय व्यक्त करणारा प्रश्न त्यांनी विचारला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अशाच प्रकारची मतांची आकडेवारी सांगून पवार यांचा दावा किती फोल आहे स्पष्ट केले आहे.
एकूणच महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर हे कसं शक्य आहे? काहीतरी गडबड आहे. असे विरोधी पक्षांनी सांगायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी तर हा माझ्या आयुष्यातील पहिला पराभव असल्याचे सांगून, मतदान प्रक्रियेबद्दल प्रश्नचिन्ह उभा केले आहे.

हेही वाचा :

आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग;’या’ 5 राशींचं भाग्य उजळणार

लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम

शॉर्ट ड्रेस, मोकळे केस, बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोरा एपी ढिल्लोनच्या गाण्यावर थिरकली