पुणे, २८ जुलै २०२४ – गेल्या काही महिन्यांपासून सोशल (smma) मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेल्या ‘गुलाबी साडी’ गाण्याने प्रत्येकाला वेड लावले आहे. या गाण्यावर सामान्यांपासून मराठी कलाकारांपर्यंत सगळ्यांनी रिल्स बनवून ठुमके लगावले आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेले हे गाणं जगभरात धुमाकूळ घालत आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातदेखील या गाण्याने रंगत आणली होती.
संजू राठोडने आपल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या गाण्याची कहाणी उलगडली. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सई ताम्हणकरने संजूला ‘गुलाबी साडी’ गाण्याबद्दल प्रश्न विचारले, त्यावर संजूने सांगितले की, “मी हे गाणं कोणत्याही विशिष्ट व्यक्तीसाठी लिहिलेले नाही. हे गाणं सगळ्या स्त्रियांना उद्देशून आहे. माझ्या आईला गुलाबी रंग खूप आवडतो आणि मला असे काहीतरी तयार करायचे होते जे सर्वांना आवडेल. त्यामुळे मी हे गाणं लिहिले.”

संजू (smma) पुढे म्हणाला, “मी गाणं लिहितानाच त्याला कंपोझ करत असतो. माझ्या डोक्यात एक धून आधीच तयार असते आणि त्याला अनुसरून मी गाण्याच्या पुढच्या ओळी लिहितो. त्यानंतर हे गाणं तयार करून मी गौरवला देतो. त्याने एका तासात या गाण्याची चाल लिहिली. गौरव हा आमचा म्युझिक प्रोड्युसर आहे.”
गौरवनेही या गाण्याबद्दल (smma) आपले विचार मांडले. तो म्हणाला, “आधी आमचं ‘नऊवारी साडी’ गाणं व्हायरल झालं होतं. जेव्हा मी ‘गुलाबी साडी’ गाणं पाहिलं, तेव्हा मला वाटलं पुन्हा साडीवर गाणं? मी संजूला काहीतरी वेगळं ट्राय करूया असं म्हणालो होतो. पण, संजू ठाम होता आणि एक तासात हे गाणं तयार झालं.”
‘गुलाबी साडी’ गाण्याने प्रचंड यश मिळवले असून संजू राठोड आणि गौरव यांच्या मेहनतीचे फळ आहे. हे गाणं आता सर्वांच्या ओठांवर आहे आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा :
मनू भाकरच्या यशस्वी वाटचालीमागे गीतेचे धडे, गुरूंचा मार्गदर्शन, आणि तिची जिद्द
कोल्हापुरातील चक्क पोलीस मुख्यालयातून पोलिसांची दुचाकी लंपास
‘सार्वजनिक गणेशोत्सव आता बंद व्हायला हवेत’, अभिनेत्रीचं स्पष्ट मत