मुंबई, ३ ऑक्टोबर २०२४: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थिनीशी (student)गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी सांगितले की, अशा प्रकरणांमध्ये कोणतीही क्षमा केली जाणार नाही आणि शिक्षेच्या दृष्टीने कडक निर्णय घेतले जातील.
फडणवीस यांनी या संदर्भात म्हणाले, “विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या घटनांना थारा दिला जाणार नाही. सरकार या प्रकारांवर सतर्क राहील आणि दोषींना कठोर शिक्षा होईल.” त्यांनी संबंधित विभागांना तातडीने या घटना तपासण्याचे निर्देश दिले आहेत.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अधिक दक्षता घेण्याचे निर्देश दिले असून, विशेष पथके नेमली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा:
कोल्हापूर : विशाळगड दंगलीतील फरार आरोपी कणेरी मठावर काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीला!
‘कोणी कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न केला तरी योजना चालूच राहतील’ : एकनाथ शिंदे
भाजप पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदेंना झुकतं माप; भाजपमध्ये नाराजीचे सुर?